लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : देशात आजही ६५ टक्के लोक शेती करतात. आपण अनेक वर्षभऱ्यात अनेक गुणवंत विद्यार्थ्यांना गौरविले. परंतु, त्यांच्याशी संवाद साधताना राजकारणी किंवा शेतकरी होतो असे त्यांनी सांगीतले नाही. भारत देशाचा टाईम टेबल ईश्वनाने अतिशय उत्कृष्ट करून दिला आहे. त्यामुळे जगाची भूक भागविण्याची ताकद केवळ भारत देशात आहे. चार वर्षांपूर्वी शेतकऱ्यांना पाहिजे तशी मदत दिली जात नव्हती. मात्र, आमच्या सरकारने मागील चार वर्षांत शेतकऱ्यांना चांगली मदत दिली आहे. राज्याच्या तिजोरीवर शेतकऱ्यांचाच पहिला हक्क असून त्या दिशेने सरकार काम करीत आहे, असे प्रतिपादन राज्याचे वित्त व नियोजन मंत्री तथा वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.कृषी विभागाच्यावतीने पाच दिवसीय जिल्हास्तरीय कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी या महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी ते मार्गदर्शन करताना बोलत होते. व्यासपीठावर खा. रामदास तडस, आ. डॉ. पंकज भोयर, आ. रामदास आंबटकर, जि.प. उपाध्यक्ष कांचन नांदूरकर, नगराध्यक्ष अतुल तराळे, जि.प. सभापती मुकेश भिसे, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, जि.प. मुख्य कार्यपालन अधिकारी अजय गुल्हाणे, जिल्हा कृषी अधीक्षक विद्या मानकर आदींची उपस्थिती होती.ना. मुनगंटीवार पुढे म्हणाले, वर्धेतील सीताफळ अंबानीच्या घरात जाणे ही कौतुकाची बाब आहे. तलाठ्याची शासकीय नोकरी सोडून शेतीतून आपला विकास साधणाºया एका शेतकऱ्यांला आपण आज गौरविले. वास्तविक पाहता हे उदाहरण म्हणजे अंधकारमय व्यवसाय म्हणून बघितल्या जाणाऱ्या शेती या व्यवसायात एक प्रकाशाची किरण ठरणारा आहे. मातीची सेवा केल्याशिवाय सोन उगवू शकत नाही. शेतकºयांनीही मोठ्या प्रमाणात रासायनिक खतांचा वापर करून भरघोस उत्पन्न घेण्यापेक्षा सेंद्रीय शेती केली पाहिजे. कारण सेंद्रीय शेती करताना जमिनीची पोत घसरत नाही. जे विकते तेच शेतकऱ्यांनी पिकविले पाहिजे. कृषी विभागाच्यावतीने आयोजित करण्यात आलेला हा कृषी महोत्सव शेतकऱ्यांसाठी धनप्राप्तीचा पर्व व्हावा, असेही यावेळी त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विद्या मानकर यांनी केले.शेतमाल निर्यातीवर भर द्या -रामदास तडसविदर्भातील अनेक प्रकल्प पूर्ण न झाल्याने येथील शेतकरी देशोधडीला लागला आहे. निसर्ग कोपन आणि शेतकरी झोपन अशी स्थिती विदर्भाची आहे. येथील शेतमाल थेट निर्यात झाल्यास त्याचा जास्तीत जास्त फायदा शेतकऱ्यांना होईल. वर्धा लोकसभा क्षेत्रात १४ प्रकल्प आहे; पण ती अपूर्ण आहेत. भाजप सरकार ती पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करीत आहे. इतकेच नव्हे तर पूर्वी केवळ एक केंद्रीय महामार्ग वर्धा लोकसभा मतदार संघात होता. तर आता वर्धा लोकसभा क्षेत्रात ती संख्या ९ झाली असल्याचे यावेळी मार्गदर्शन करताना खा. रामदास तडस यांनी सांगितले. सरकारने शेतमाल निर्यातीवर भर द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली.या शेतकऱ्यांचा झाला गौरवफळबाग शेती करून सीताफळ व केळीचे विक्रमी उत्पन्न घेतल्या बद्दल समुद्रपूर तालुक्यातील हळदगाव येथील सुरेश पाटील, वर्धा तालुक्यातील पवनार येथील कुंदन वाघमारे, हिंगणघाट तालुक्यातील सुलतानपूर येथील शेतकरी रतनलाल बोरकर यांना ना. मुनगंटीवार यांच्या हस्ते गौरविण्यात आले. तसेच जया चंद्रकांत उघडे, सुधाकर पुंडलिक शेंडे, गोपाल अशोक वाघमारे, सविता येळणे, श्रीकांत अंबादास तोटे, महेश मुधोळकर व नरेश काळपांडे या शेतकऱ्यांचाही सत्कार ना. मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आला.साहेब, सफरचंद नव्हे बोर!वर्धा : कृषी महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी सर्वप्रथम ना. सुधीर मुनगंटीवार, खा. रामदास तडस, आ. पंकज भोयर, आ. रामदास आंबटकर, जिल्हाधिकारी शैलेश नवाल आदी मान्यवरांनी महोत्सवात असलेल्या विविध स्टॉलची पाहणी केली. यावेळी ना. सुधीर मुनगंटीवार कृषी विकास अधिकारी जि.प. वर्धाच्यावतीने लावण्यात आलेल्या एका स्टॉलवर थांबले. त्यांनी एक फळ हाती घेत हे कुठले फळ आहे. सफरचंद काय? असा प्रश्न तेथील अधिकाऱ्याला केला. त्यावर कृषी अधिकारी मनोज नागपूरकर यांनी साहेब हे सफरचंद नाही, अॅपल बोर आहे, असे सांगितले. त्यानंतर ना. सुधीर मुनगंटीवार यांना त्या बोराचे छायाचित्र काढण्याचा मोह आवरता आला नाही. त्यांनी आपल्या खिशातून मोबाईल काढून स्टॉलवर असलेल्या अॅपल बोराचे छायाचित्र कॅमेराबद्ध केले, हे विशेष.कृषी विभागाने शेतकऱ्यांप्रती गंभीर राहावे -पंकज भोयरवर्ध्यातील सीताफळ मुकेश अंबानी खरेदी करतात हे जिल्ह्यातील शेतकऱ्यांसह कृषी विभागालाही माहिती नाही. ही खरच खेदाची बाब आहे. कृषी विभागाने शेतकऱ्यांप्रती गंभीर राहावे, असे यावेळी आ. डॉ. पंकज भोयर यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले.नुकसान भरपाईसाठीचा नवा कायदा सरकारच्या विचाराधीनवन्य प्राण्यांकडून शेत पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले जाते. परंतु, नुकसान भरपाईही वेळीच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मिळत नाही.नुकसानग्रस्ताला अवघ्या १५ दिवसात शासकीय मदत मिळावी. तसेच विलंब झाल्यास त्यांना व्याजासकट नुकसान भरपाई मिळावी यासाठीचा कायदा आम्ही तयार करीत असल्याचे याप्रसंगी ना. सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले.
राज्याच्या तिजोरीवर शेतकऱ्यांचा पहिला हक्क
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 05, 2019 9:27 PM
देशात आजही ६५ टक्के लोक शेती करतात. आपण अनेक वर्षभºयात अनेक गुणवंत विद्यार्थ्यांना गौरविले. परंतु, त्यांच्याशी संवाद साधताना राजकारणी किंवा शेतकरी होतो असे त्यांनी सांगीतले नाही. भारत देशाचा टाईम टेबल ईश्वनाने अतिशय उत्कृष्ट करून दिला आहे.
ठळक मुद्देसुधीर मुनगंटीवार : जिल्हास्तरीय कृषी महोत्सवाचे उद्घाटन, कृषी विभागाचा उपक्रम