शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्ताधारी सत्तेसाठी खालच्या थराला जात आहेत; देशमुखांवरील हल्ल्यानंतर शरद पवारांचा संताप
2
भाजपावर हल्लाबोल, मनसेची काढली लायकी; अबु आझमींचं कौतुक, संजय राऊत सभेत कडाडले
3
'राहुलजी! आम्ही आणलेली गुंतवणूक बघा'; देवेंद्र फडणवीस यांनी दिले आव्हान
4
ब्राझीलमध्ये नरेंद्र मोदी आणि जॉर्जिया मेलोनी यांच्यात बैठक, 'या' मुद्द्यांवर झाली चर्चा!
5
कोणत्या पवारांची जादू चालणार? भाजप-शिंदेसेनेला बळ मिळेल का? मविआ- महायुती यांच्यात जोरदार लढत!
6
Maharashtra Election 2024 Live Updates: राज्यात प्रचारतोफा थंडावल्या, आता मतांची तोफ मतदारांच्या हाती!
7
महागड्या कर्जामुळे जनता त्रस्त, बँकांनी व्याजदर कमी करण्याची गरज : निर्मला सीतारामन
8
राहुल गांधींनी कोर्टात हजर राहावे; वीर सावरकर बदनामी प्रकरणी पुणे कोर्टाचे आदेश
9
नवीन कथेसह दाखल झाला 'कांतारा २'चा टीझर, शिव रुपात दिसला ऋषभ शेट्टी
10
आपल्या पैशांची FD करायचा विचार करताय? वापरा 'ही' युक्ती, मिळेल जास्त नफा
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
12
ISRO-SpaceX ची भागीदारी यशस्वी, Elon Musk यांनी लॉन्च केलं भारताचं सॅटेलाइट; आता प्लेनपासून गावापर्यंत मिळेल नेट!
13
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: फसव्या व्यवहारामुळे संघर्ष होण्याची शक्यता!
14
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
15
लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईला अमेरिकेत अटक
16
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
17
मविआचे सरकार आल्यास २,८०,००० रोजगार देणार; मल्लिकार्जुन खरगे यांचे आश्वासन
18
धर्म धोक्यात नाही तर आरक्षण धोक्यात आहे, श्रीकृष्ण आयोग लागू करा -प्रकाश आंबेडकर
19
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
20
हिंसाचारग्रस्त मणिपुरात आणखी ५ हजारांवर जवान करणार तैनात; गृहमंत्री अमित शाहांनी घेतला आढावा

शेतकऱ्याच्या गोदामाला भीषण आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2019 11:56 PM

नजीकच्या वेळा शिवारात शेतकऱ्याच्या गोदामाला अचानक आग लागली. बघता-बघता आगीने रौद्ररुप धारण करून गोदामातील कापूस, तूर, सोयाबीन, चणा, गहू व इतर साहित्याला आपल्या कवेत घेतल्याने शेतकरी चंदू पंडित यांचे सुमारे दीड कोटींचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येते.

ठळक मुद्देदीड कोटींचे नुकसान : आगीवर नियंत्रण मिळविताना दोघे जखमी, तासाभरानंतर परिस्थिती आटोक्यात

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणघाट : नजीकच्या वेळा शिवारात शेतकऱ्याच्या गोदामाला अचानक आग लागली. बघता-बघता आगीने रौद्ररुप धारण करून गोदामातील कापूस, तूर, सोयाबीन, चणा, गहू व इतर साहित्याला आपल्या कवेत घेतल्याने शेतकरी चंदू पंडित यांचे सुमारे दीड कोटींचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येते. ही घटना शनिवारी रात्री १०.३० वाजताच्या सुमारास घडली असून आगीवर नियंत्रण मिळविताना दोन जण किरकोळ जखमी झाले.वेळा शिवारात शेतकरी चंदू पंडित यांच्या मालकीचे शेतमाल साठवणुकीचे गोदाम आहे. शिवाय त्यांच्याकडे कुटुंबियांची संयुक्त ११३ एकर शेती आहे. शेतमाल साठवणुकीसाठी त्यांनी गावात ३००० चौरस फुट जागेवर गोदामाची निर्मिती केली. या गोदामात ८२० क्विंटल कापूस अंदाजे किंमत ४५ लाख, ११ लाख रुपये किंमतीचे ३०० क्विंटल सोयाबीन, २५० क्विंटल तूर किंमत १३ लाख, २ लाख ९२ हजार किंमतीचा ७५ क्विंटल चना, २ लाख २२ हजार रुपये किंमतीचा १०७ क्विंटल गहू, तसेच सहा लाख रुपये किंमतीचे शेतउपयोगी साहित्य, ६९ लाख किंमतीचे सागाचे लाकूड असा एकूण दीड कोटींचा मुद्देमाल ठेवून होता. शनिवारी रात्री या गोदामाला अचानक आग लागल्याने हे साहित्य जळून कोळसा झाले.शेतमाल ठेवण्याच्या गोदामाला आग लागल्याचे लक्षात येताच ग्रामस्थांनी घटनास्थळाकडे धाव घेत आगेवर पाण्याचा मारा करून नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला. यात अमोल लोणकर व मंगेश सायंकार हे किरकोळ जखमी झाले. माहिती मिळताच हिंगणघाट न.प.चा अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाला. सुमारे तासभºयाच्या प्रयत्नाअंती आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. या घटनेमुळे पंडित कुटुंबिय पूर्णत: हादले असून ही आग महावितरणच्या दुर्लक्षी धोरणामुळे लागल्याचा त्याचा आरोप आहे. माहिती मिळताच सहाय्यक फौजदार महादेव महाजन, जमादार गिरमकर यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. या घटनेची नोंद पोलिसांनी घेतली आहे. नुकसानग्रस्त शेतकरी कुटुंबियांना शासकीय मदत मिळावी, अशी अपेक्षा आहे.पंडित कुटुंबाकडे ११३ एकर शेतीपंडित कुटुंबाकडे कुटुंबाबातील विविध सदस्याच्या नावाने एकूण ११३ एकर शेती आहे. त्यात रमाबाई देवराव पंडित, प्रेमराज देवराव पंडित, चंद्रकांत देवराव पंडित, सचिन देवराव पंडित, विशाल उत्तम पंडित व रेखा उत्तम पंडित यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे हे सर्व संयुक्तपणे शेती करतात. शेतीतील पिकविलेले त्यांनी या गोदामात ठेवले होते. ते आगीत जळून कोळसा झाल्याने पंडित कुटुंब पूर्णत: हादरले आहे. शेतीसह विविध स्वरूपाचे घेतलेल्या कर्जाची परतफेड कशी करावी, अशा प्रश्न सध्या त्यांच्यापुढे आहे. विद्युत दाब कमी-जास्त होऊन आगीची ठिणगी पडून ही घटना घडल्याची घटनास्थळी चर्चा होत होती.दहा कोंबड्या आगीच्या भक्ष्यस्थानीगोदामातून धूर निघत असल्याचे लक्षात येताच ग्रामस्थांनी घटनास्थळाकडे धाव घेत आगीवर पाण्याचा मारा करून परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला. परंतु, आगीने बघता-बघता रौद्ररुप धारण केल्याने सदर गोदामातील दहा कोंबड्याचा होरपळून मृत्यू झाला. अग्निशमन दलाच्या जनावांनी ग्रामस्थांच्या सहकार्याने आगीवर सुमारे एक तासानंतर नियंत्रण मिळविले.एका लाईनमनवर तीन गावांचा ताणतीन हजार लोकसंख्येच्या या गावासाठी गत एक वर्षांपासून स्थायी लाईनमन नाही. त्यामुळे लहान वणीच्या लाईनमनकडे येथील अतिरिक्त कामाचा बोझा देण्यात आला आहे. सदर लाईनमन तीन गावांचे कामकाज पाहतो. विद्युत तारा एकमेकांना लागू नये याची दक्षता घेणे क्रमप्राप्त असताना वीटा बांधून तारा लटकत असल्याचे या भागात दिसून येते. याकडे महावितरणच्या वरिष्ठ अधिकाºयांनी लक्ष देण्याची गरज आहे.ग्राहकाच्या विद्युत मीटरपर्यंत विद्युत पुरवठ्याची जबाबदारी विद्युत वितरण कंपनीची आहे. या गोदामावरून कुठलाही उच्च व लघु दाबाची विद्युत वाहिनी गेलेली नाही. तसेच या भागात विद्युत दाब कमी- जास्त होत असल्याची कुठल्याही विद्युत ग्राहकाची तक्रार नाही; पण घटना घडल्याने चौकशी अनिवार्य आहेच. महावितरणचे अधिकारी व विद्युत निरीक्षकांकडून चौकशी करण्यात येईल.- हेमंत पावडे, कार्यकारी अभियंता, महावितरण, हिंगणघाटशेतकºयांच्या पीक संरक्षणासाठी कुठलेही आश्वस्त व शाश्वत धोरण सरकारकडे नाही. शिवाय आज हे जे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले त्याच्या भरपाईसाठी कुठलीही योजना किंवा कुठलेही धोरण शासनाकडे नाही. शेतकरी आरक्षणातील पीक संरक्षणाचा पर्याय अशा प्रकारच्या नुकसानीच्या वेळी पीक उत्पन्न किंमतीचे संरक्षण या आरक्षणाद्वारेच शेतकºयांना पुरविणार आहे. म्हणून शेतकºयांच्या आश्वस्त रक्षणासाठी व दीर्घकालीन विकासात्मक उपाययोजना म्हणून हा पर्याय अमलात आणणे गरजेचे आहे. अशाच प्रकारच्या आगीमुळे एखाद्या उद्योजकाची किंवा जिनिंग मालकाचे नुकसान झाले असते तर त्याला लगेच नुकसान भरपाई मिळाली असती. मात्र, अशाच प्रकारचे नुकसान शेतकºयांचे झाल्यावर कुठलाही पर्याय नसल्याची बाब या कृषिप्रधान देशासाठी दुर्भाग्यपूर्ण आहे.- शैलेश अग्रवाल, प्रणेते, शेतकरी आरक्षण.

टॅग्स :fireआगFarmerशेतकरी