लोकमत न्यूज नेटवर्कआकोली : सातबाराचा वापर करून चक्क दीड लाखांच्या कर्जाची उचल करून बळीराजासह शासनाची फसवणूक करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे. या प्रकरणी फसवणूक झालेल्या शेतकऱ्याने पोलीस अधीक्षकांसह जिल्हाधिकाऱ्यांना लेखी तक्रार केली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी सुकळी (बाई) येथील शेतकरी ज्ञानेश्वर गौळकर यांनी केली आहे.शेतकरी ज्ञानेश्वर गौळकर यांची सुकळी (बाई) येथे ०.५३ हेक्टर शेती आहे. ही शेती वडिलोपार्जित असून हे क्षेत्र सद्यस्थितीत सामायिक वारसदार म्हणून धनराज गौळकर, ज्ञानेश्वर भाऊराव गौळकर, लिला भाऊराव गौळकर, बेबी विनोद वडतकर यांची नावे आहेत. त्यांच्या शेतीवर सुकळी (बाई) येथील बँक ऑफ इंडिया शाखेतून २६ ऑगस्ट २०१५ ला शेती गहाणद्वारे दीड लाखाच्या कर्जाची उचल करण्यात आली आहे. जमिनीचे क्षेत्रफळ ०.५३ हेक्टर असताना फेरफार नोंदवहीवर बँकेने जमिनीचे क्षेत्रफळ हे १.७० हेक्टरआर असे दाखविण्यात आले आहे. बँकेनेच माझ्या शेतावर १ लाख ५० हजार रुपये उचल करीत फसवणूक केल्याचा आरोप शेतकऱ्याने केला आहे. या शेतकऱ्याच्या कुटुंबातील कुठल्याही सदस्याने २०१५ मध्ये कर्जाच्या मागणीसाठी अर्ज केला नाही. तसेच आतापर्यंत कुठलेही कर्ज घेतलेले नाही. परंतु, कर्जाची उचल केल्याचे कागदपत्रांवर दाखविले जात असल्याने शेतकऱ्याच्या अडचणीत भर पडली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शेतकरी ज्ञानेश्वर गौळकर यांनी केली आहे.बँकेने कर्ज परत केल्याचे दिले पत्रया शेतकऱ्याच्या कुटुंबातील कुठल्याही व्यक्तीने शेतीवर कर्ज घेतले नाही. मात्र, हे पिक कर्ज बँकेला परत केल्याचे पत्र २० एप्रिल २०२० ला तलाठी कार्यालयाकडे तसेच शेतकऱ्याला दिले. शेतकऱ्याने ते कर्ज घेतलेच नाही तर बँकेने त्यांना कर्ज परत केल्या संदर्भातील पत्र कसे दिले हा सध्या संशोधनाचा विषय ठरत आहे.शेतकऱ्यांना शेती वरील आणि गहाण संदर्भातली केसेस रजिस्टर दस्तऐवज बँकेकडून दुय्यम निबंधक कार्यालयाकडून मागण्यात येते. परंतु, दस्तऐवज क्रमांक शुन्य राहतच नाही.- एन. एन. रामटेके, दुय्यम निबंधक, सेलू.महसूल विभागाने शेतकऱ्यांच्या सातबारावर बोजा चढविला आहे. शेतकऱ्याने पैशाची उचल केलीच नाही. बँकेकडून शेतकऱ्याला २०१५ मध्ये दीड लाख रुपये कर्ज स्वरूपात रक्कम उचल केल्याची तसेच २०२० मध्ये कर्ज भरणा केल्या संदर्भातील ते पत्र चुकीने देण्यात आले आहे. त्यामुळे आमच्या बँकेची या प्रकरणात काहीही चूक नाही.- अविनाश कानेकर, शाखा व्यवस्थापक, बँक ऑफ इंडिया, सुकळी (बाई).माझ्या भावाला कर्करोगाने ग्रासले आहे. त्याच्या उपचारासाठी पैसे मिळावे म्हणून मी शेतीवर किती कर्ज मिळते हे विचारण्यासाठी गेलो असता हा प्रकार उजेडात आला. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी.- ज्ञानेश्वर गौळकर, शेतकरी, सुकळी (बाई).
शेतकऱ्याच्या मस्तकी बँकेने मारले कर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2020 5:00 AM
शेतकरी ज्ञानेश्वर गौळकर यांची सुकळी (बाई) येथे ०.५३ हेक्टर शेती आहे. ही शेती वडिलोपार्जित असून हे क्षेत्र सद्यस्थितीत सामायिक वारसदार म्हणून धनराज गौळकर, ज्ञानेश्वर भाऊराव गौळकर, लिला भाऊराव गौळकर, बेबी विनोद वडतकर यांची नावे आहेत. त्यांच्या शेतीवर सुकळी (बाई) येथील बँक ऑफ इंडिया शाखेतून २६ ऑगस्ट २०१५ ला शेती गहाणद्वारे दीड लाखाच्या कर्जाची उचल करण्यात आली आहे.
ठळक मुद्देदीड लाखांची फसवणूक : पोलीस अधीक्षकांकडे तक्रार