कृषी पंपाला १२ तास वीज देण्याची मागणीवर्धा : पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांना ओलीत करून पिक जगविण्याची कसरत करावी लागत आहे. अशात ऐन ओलिताच्या वेळी महावितरणद्वारे भारनियमन सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या कृषीपंपांना सलग १२ तास वीज पुरवठ्याच्या मागणीकरिता मंगळवारी शेतकऱ्यांनी महावितरणच्या कार्यालयावर धडक देत आंदोलन केले.या आंदोलनातून तुटलेल्या वीज तारांच्या स्पर्शाने मृत्यू झालेल्या जनावरांचा मोबदला देण्यात यावा, कंपनीत रिक्त असलेली पदे भरण्यात यावी, अशा अनेक मागण्या यावेळी करण्यात आल्या. तळेगाव (टा.) येथे दोन महिन्यापासून वीज अभियंत्याचे रिक्त पद भरण्याची मागणीही करण्यात आली. यावेळी मिलिंद भेडे, प्रशांत इंगळे तिगावकर, जयंत कावळे, जयंत येरावार, ज्ञानेश्वर ढाले, मनोज तरारे, हेमंत मंगरूळकर आदी शेतकरी उपस्थित होते.(प्रतिनिधी)आंदोलनात भाजपाचेच पदाधिकारी महावितरणच्या बोरगाव येथील कार्यालात शेतकऱ्यांच्या नावावर आंदोलन करण्यात आले. येथे शेतकरी कमी भाजपाचे पदाधिकारीच अधिक होते. दोन दिवसांपूर्वीच उर्जामंत्र्यांनी वर्धेत वीज पुरवठा सुरळीत करण्याच्या सूचना केला. त्यानंतरही भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी हे आंदोलन केले. यामुळे त्यांचा त्यांच्याच मंत्र्यांच्या वक्तव्यावर विश्वास नसल्याची चर्चा कार्यालयात जोरात होती.
शेतकऱ्यांची वीज वितरण कंपनीवर धडक
By admin | Published: September 07, 2016 1:07 AM