शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
8
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
9
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
10
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
11
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
12
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
13
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
14
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
15
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
18
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
19
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

अवघ्या दहा मिनिटातच शेतकऱ्याचे कर्ज मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 03, 2020 5:00 AM

ग्राहकांनी बँकेत येताना मास्क लावून साबणाने हात धुवून बँकेत यावे असा फलक बँक व्यवस्थापनाने लावला. नागरिक या आदेशाचे पालनही करीत आहे; परंतु शिवसेनेचे पदाधिकारी शाखा व्यवस्थापकांशी चर्चा करायला गेले त्यावेळी व्यवस्थापकांच्या तोंडाला मास्क नसल्याने आधी मास्क लावा हो साहेब, नंतरच बोला अशा शिवसैनिकांनी सूचना देताच शाखा व्यवस्थापक रघाटाटे यांनी तोंडाला मास्क लावला.

ठळक मुद्देशिवसेनेच्या आंदोलनाचा धसका : विरुळच्या भारतीय स्टेट बँकेच्या शाखेतील प्रकार

लोकमत न्यूज नेटवर्कविरूळ (आकाजी) : येथील बँकेचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला असून शिवसेना जिल्हाप्रमुखांनी आंदोलनाची धमकी देताच बँकेच्या अधिकाऱ्यांनी अवघ्या दहा मिनिटातच शेतकऱ्याचे कर्जप्रकरण मंजूर केले.जुलै महीना आला तरी अनेक शेतकरी पीककर्जापासून वंचित आहेत. दरम्यान शेतकऱ्यांनी शिवसेना जिल्हाप्रमुख बाळा शहागडकर यांच्याशी संपर्क साधून याबाबत माहिती दिली.शिवसेना जिल्हाप्रमुख व शिवसैनिकांनी स्टेट बँकेला भेट देऊन शाखा व्यवस्थापक रघाटाटे व कृषी बँकेच्या अधिकाऱ्यांची भेट घेत चर्चा केली. यापुढे पीककर्जाच्या तक्रारी प्राप्त झाल्या तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला. बँकेने पीककर्ज प्रकरण त्वरित निकाली काढून शेतकऱ्यांचे समाधान केले. यावेळी पुलगाव शहर प्रमुख नाना माहुरे, राजाभाऊ खेडकर, ओंकार धांदे, आर्वी पंचायत समितीच्या उपसभापती शोभा मनवर, विरुळचे उपसरपंच नितीन पोलकडे, कैलास उपासे, नाना सोनटक्के यांच्यासह शिवसेनेचे इतर पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शेकडो शेतकरी या वेळी उपस्थित होते.बँकेत अपुरा कर्मचारीवर्ग; कामकाजावर परिणामयेथील बँक व्यवस्थापक कोरोना काळात मुंबईला गेले असून चार महिन्यांपासून लॉकडाऊनमुळे मुंबईतच अडकले आहेत. त्यामुळे तात्पुरता कार्यभार रघाटाटे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. या बँकेत अपुरा कर्मचारीवर्ग असल्याने नागरिकांची वेळीच कामे होत नाहीत. एटीएम मागील चार महिन्यांपासून बंद आहे. मात्र, याकडे कुणाचेही लक्ष नाही.आधी तोंडाला मास्क लावा हो साहेब...ग्राहकांनी बँकेत येताना मास्क लावून साबणाने हात धुवून बँकेत यावे असा फलक बँक व्यवस्थापनाने लावला. नागरिक या आदेशाचे पालनही करीत आहे; परंतु शिवसेनेचे पदाधिकारी शाखा व्यवस्थापकांशी चर्चा करायला गेले त्यावेळी व्यवस्थापकांच्या तोंडाला मास्क नसल्याने आधी मास्क लावा हो साहेब, नंतरच बोला अशा शिवसैनिकांनी सूचना देताच शाखा व्यवस्थापक रघाटाटे यांनी तोंडाला मास्क लावला.

टॅग्स :Crop Loanपीक कर्जFarmerशेतकरी