शहरं
Join us  
Trending Stories
1
ते आले, उमेदवाराने अर्ज भरला, ते गेले; राज ठाकरे यांनी पुन्हा केला मनसैनिकांचा हिरमोड
2
आजचे राशीभविष्य : स्त्री वर्गाकडून विशेष लाभ होईल, धनप्राप्तीसाठी आजचा दिवस अनुकूल
3
मुंबईत काँग्रेसचे ४ अल्पसंख्याक उमेदवार; पहिल्या यादीत अस्लम शेख, अमीन पटेल आदींची नावे
4
मंगल प्रभात लोढा यांची संपत्ती ४३६ कोटी! पाच वर्षांत ठाकरे, आव्हाडांची संपत्ती कितीने वाढली?
5
बारामतीत अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार काका-पुतण्या लढत; गडचिरोलीत वडील विरुद्ध मुलगी
6
बडे नेते, कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत सर्वांनीच केले शक्तिप्रदर्शन; अर्जासाठी साधला मुहूर्त
7
एलओसीजवळ दहशतवादी हल्ला, दाेन जवान शहीद; जम्मूत पुन्हा भ्याड कृत्य; दाेन हमालही ठार
8
महायुतीत २७८ जागांवर ठरले; आता १० जागांचाच तिढा! अमित शाहांसोबतच्या बैठकीत निर्णय
9
काँग्रेसने २५ विद्यमान आमदारांना पुन्हा दिली उमेदवारीची संधी; ४८ जणांची पहिली यादी जाहीर
10
घड्याळ वापरा, पण अटही पाळा; अजित पवार गटाला सर्वोच्च न्यायालयाच्या कानपिचक्या
11
महायुती सरकारला धडा शिकविण्याची हीच खरी वेळ; विनेश फोगाट यांचा महायुतीवर घणाघात
12
सुधीर साळवींना उमेदवारी नाकारल्याने शिवडीत ठाकरे गटात नाराजी, राजीनामा देण्याची तयारी
13
जस्टीस संजीव खन्ना होणार देशाचे पुढील सरन्यायाधीश; 11 नोव्हेंबरला पदभार स्वीकारणार...
14
"...तर मी येवल्यातून भुजबळांविरोधात निवडणूक लढवेन", सुहास कांदेंना शिंदे-फडणवीसांचा मेसेज काय?
15
"त्यांचा इतिहासच गद्दारीचा, आईबापासोबतही..."; छगन भुजबळांचा कांदेंनी काढला इतिहास
16
गुलमर्गमध्ये लष्कराच्या वाहनावर दहशतवादी हल्ला, 5 जवान जखमी तर एका साथीदाराचा मृत्यू
17
अयोध्येतील 55 घाटांवर 28 लाख दिव्यांची रोषणाई; झळाळून निघणार श्रीराम जन्मभूमी...
18
'भ्रष्टाचार, गुन्हेगारी वाढली', उमेदवारी मिळताच युगेंद्र पवारांनी काकाविरोधात थोपाटले दंड
19
'मविआ'त सांगोला मतदारसंघ कोणाला? जयंत पाटील म्हणाले, "एक-दोन दिवसात..."
20
ना हडपसर, ना खडकवासला...ठाकरे गटात प्रवेश केलेले वसंत मोरेंचा पुढचा प्लॅन ठरला

शेतमालाला भाव व कर्जमुक्तीसाठी किसान सभेचे धरणे

By admin | Published: April 30, 2017 1:04 AM

स्वामीनाथन आयोगाने केलेल्या शिफारशीप्रमाणे शेतमालाचे हमीदर निश्चित करावे. ते दर बाजारपेठेत मिळतील, ...

तहसीलदारांना निवेदन : सावकारांना बेड्या ठोकण्याची मागणीहिंगणघाट : स्वामीनाथन आयोगाने केलेल्या शिफारशीप्रमाणे शेतमालाचे हमीदर निश्चित करावे. ते दर बाजारपेठेत मिळतील, अशी व्यवस्था करावी. सर्व शेतकऱ्यांवरील कर्ज माफ करून सात-बारा कोरा करावा यासह अन्य मागण्यांसाठी तहसील कार्यालयासमोर किसान सभेद्वारे एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी तहसीलदार यादव व उपविभागीय अधिकारी पाटील यांना निवेदन सादर करण्यात आले.सावकारीच्या पैशात शेताची विक्री करून घेऊन शेती हडप करण्याचा प्रयत्न करणाऱ्या अवैध सावकारांना बेड्या ठोका. वहिवाटदार म्हणून शेताच्या सात-बारावर नोंद घेण्याची सर्व प्रकरणे निकाली काढावी. सिलींग जमिनीचे उपविभागीय अधिकारी कार्यालय येथील गोविंदपूरचे प्रकरण त्वरित निकाली काढावे, आदी मागण्याही करण्यात आल्या. शिष्टमंडळात यशवंत झाडे, जगन चांभारे, जानराव नागमोते, चंद्रभान नाखले, भास्कर डवरे, प्रशांत चरडे, गजानन काळे, देवेंद्र शिनगारे, ज्ञानेश्वर वैरागडे, रामभाऊ खेलकर, विनोद दातारकर आदंचा समावेश होता. यावेळी तहसीलदार व उपविभागीय अधिकारी यांनी चर्चेअंती मागण्या त्वरित निकाली काढण्याचे आश्वासन दिले. राज्य उपाध्यक्ष झाडे यांनी जगाला जगविणारा, धान्य पिकविणारा शेतकरी महाराष्ट्रात आत्महत्या करतो. दरवर्षी ५ हजारांहून अधिक शेतकरी शेती परवडत नाही म्हणून आत्महत्या करतात. या आत्महत्यांचे सत्र आता त्यांच्या कुटुंबात मुला-मुलींपर्यंत पोहोचले आहे; पण राज्य व केंद्र शासनाला याची चिंता नाही. आम्हाला दिल्ली-मुंबईच्या तक्तावर बसवा, राज्य द्या म्हणजे आम्ही शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करू, स्वामीनाथन आयोग लागू करू, असे पूर्वी आश्वासन देणाऱ्या भाजपला त्यांच्याच घोषणेचा विसर पडल्याचे दिसून येत आहे. सत्तेसाठी सर्व काही, ‘बोलाचीच कढी व बोलाचाच भात’ असा अनुभव शेतकरी भाजपाच्या राज्यात घेत असल्याचे दिसते. दोघांच्याही राज्यात शेतकरी आत्महत्या व शेतमाल लुटीची प्रक्रिया सुरूच आहे. यामुळे शेतकऱ्यांनी किसान सभेच्या नेतृत्वाखाली संघटीत होऊन संघर्ष करावा व न्याय मिळवून घ्यावा, असे आवाहन केले. याप्रसंगी चंद्रभान नाखले, जानराव नागमोते, संजय भगत, पांडुरंग राऊत यांनीही शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन जगन चांभारे यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्रशांत चरडे यांनी मानले. धरणे आंदोलनामध्ये किसान सभेच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह तालुक्यातील शेतकऱ्यांनी सहभाग घेतला. कार्यक्रमा व आंदोलनाच्या यशस्वीतेकरिता निवृत्ती राखुंडे, प्रफुल लढी, निलेश चरडे, श्रीकृष्ण बावणे, विनोद नगराळे, गुलाब घाटे, बाबाराव वैरागडे, कवडू मेश्राम आदींनी सहकार्य केले.(तालुका प्रतिनिधी)