वेळी अवेळी होतो विद्युत पुरवठा खंडितनाचणगाव : परिसरातील कोळोणा, घोडेगाव, सोनारा, गांगापूर, इंझाळा इत्यादी गावात विजेच्या लपंडावामुळे शेतकरी त्रस्त झालेला आहे. रबीतील हरभरा पिकासाठी जमीन तयार करणे, तर लाल्या आल्याने खरीपातील कापूस, तुरीला पाण्याची आवश्यकता असताना वेळी अवेळी होणाऱ्या अघोषित होणाऱ्या भारनियमनामुळे शेतकरी मेटाकुटीस आला आहे. शेतात वीज राहत नसल्याने मोटरपंप शोभेची वास्तू ठरत आहे. भारनियमन कधी दिवसा तर कधी रात्री होते. यातही त्याचा ठराविक वेळ नाही. दिवसाचे ओलित करणे सोयीस्कर होत असले तरी विजेअभावी शेतकऱ्यांना ते शक्य होत नसल्याने दिसून आले आहे. रात्रीला वीज उपलब्ध राहते, मात्र यावेळी थंडीमुळे ओलित करणे अडचणीचे ठरत आहे. महावितरणकडून होत असलेल्या चालूबंद वीज पुरवठ्यामुळे अनेक अडवचणी निर्माण होत आहे. होत असलेल्या विजेच्या लपंडावामुळे शेतकऱ्यांची चांगलीच परवड होत आहे. वीज पुरवठा असताना ओलीस सुरू करताच पुरवठा खंडीत होतो. यामुळे शेतकऱ्यांना हातचे काम सोडून मोटारपंप बंद करण्याकरिता धावपळ करावी लागते. यासंदर्भात शेतकऱ्यांनी विजयगोपाल येथील विजवितरण कार्यालयात तक्रार केली असता त्यांच्या समस्येचे निराकरण करण्याचे आश्वासन दिले होेते. मात्र होत असलेला विजेचा लपंडाव सुरूच असल्याचे दिसून आले. याकडे ्रविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी आहे.(वार्ताहर)उघडे रोहित्र देतात अपघाताला निमंत्रणकोळोणा शिवारातील या रोहित्राच्या ग्रिप फुटलेल्या आहे. या तुटक्या ग्रिपच्या माध्यमातून येथील वीज पुरवठा सुरू आहे. असे असताना येथे नव्या ग्रिप टाकण्याचे सौजन्य महावितरण कंपनीने दाखविले नाही. रोहित्राच्या बाजूला कचरा वाढलेला आहे. त्याच्या जवळ जाणेही कठीण झाले आहे. ही यंत्रणा डिपीतील तात्त्काळ दुरूस्त करणे गरजेचे आहे. विद्युत पुरवठ्यात अडथळा येणार आहे.
भारनियमनामुळे शेतकरी मेटाकुटीस
By admin | Published: November 11, 2016 1:47 AM