लोकमत न्यूज नेटवर्कसेलू : जंगली श्वापदांपासून पीक वाचविण्यासाठी शेतकरी वाटेल ते प्रयोग करतो, मात्र जंगली श्वापदांचा मुक्तसंचार अलीकडे खुप वाढला आहे. त्यामुळे तळहाताच्या फोडाप्रमाणे काळजी घेवून वाढविलेले पीक एका रात्रीतून फस्त केल्या जाते. नाईलाज म्हणून जीवावर उदार होवून अनेक शेतकरी मृत्यूचे सापळे लावतात परंतु क्षुल्लक चुकीने अनेकदा शेतकरीच यात बळी ठरतो. या घटना टाळण्यासाठी शेतकऱ्यांकडे इलाज नसला तरी शेतकऱ्यांनी हा जीवावरचा घातक खेळ थांबविण्याची गरज आहे.जंगली श्वापदांमुळे शेतकऱ्यांना शेती कशी करावी हा प्रश्न आहे. रानडुकर, रोही, अस्वल व इतर प्राण्यांचा मुक्त संचार असतो. पेरलेल्या पिकांची एका दिवसात माती केल्या जाते. नाईलाजाने शेतकरी शेताच्या सभोवताल बारीक तार लावून त्यात रात्रभर वीजप्रवाह सोडत असतात. अनेकदा चुकीने शेतकऱ्यांचा बळी गेल्याच्या घटना घडतात. शेतकरी वाघ बिबट व इतर जंगली श्वापदांच्या भितीमुळे आता पिकांची जागल करून शकत नाही. आंधार पडण्यापूर्वी शेतातून घरी यावे लागते. मजुर लोक माणसावर हल्ले झाल्याच्या घटनेने कामावर यायला तयार नसतात. अनेकांच्या शेतात रोह्यांची कळप जातात. रानडुक्कर पिकांची नासाडी करते. शेतात महागडे बि-बियाणे पेरल्यावर या प्रकोपामुळे मोठे नुकसान होते. हे माहित असूनही हा जुगार शेतकरी नाईलाजाने दरवर्षी खेळतो यात त्यांचे मोठे नुकसान होते. प्रसंगी स्वत:च्या जीवाशी खेळून शेती करणाऱ्या या शेतकऱ्यांकडे शासनाने विशेष वाव म्हणून लक्ष द्यावे अशी आमगाव, सोंडी, सालई, सालई (पेवठ) येथील शेतकऱ्यांची मागणी आहे.वनविभागाची मदतीसाठी टाळाटाळवन्यप्राण्यांच्या मुक्त संचारामुळे शेती हा व्यवसाय करणे तेथील शेतकऱ्यांना कठीण आहे. आता जंगली श्वापदांचे कळप सर्वत्र विखुरले आहे. शेतकरी या प्राण्यांपासून पीक वाचविण्यासाठी स्वत:च्या जीवाची पर्वा करीत नाही. शासन नुकसानग्रस्त शेतकरी व जखमींना नाममात्र भरपाईसाठी वर्षांनुवर्षे झुलवित ठेवते. अनेक शेतकऱ्यांना आशा सोडून दिली. सालईचा गजानन सराडे नावाचा तरूण व्यवसाय सोडून स्वत:ची शेती कसायला लागला. तर त्याच्या हाताला वन्यप्राण्यांमुळे शेतीतून काहीच येत नाही. असे तो सांगत होता, हीच अवस्था सर्वांची आहे.
पीक वाचविण्यासाठी शेतकऱ्यांचा मृत्यूशी खेळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2020 5:00 AM
लोकमत न्यूज नेटवर्क सेलू : जंगली श्वापदांपासून पीक वाचविण्यासाठी शेतकरी वाटेल ते प्रयोग करतो, मात्र जंगली श्वापदांचा मुक्तसंचार अलीकडे ...
ठळक मुद्देवन्यप्राण्यांकडून नुकसान । विजेच्या धक्क्याने शेतकºयाचा जंगलव्याप्त भागात मृत्यू