लोकमत न्यूज नेटवर्कपवनार : शेतकऱ्यांच्या हाती असे तंत्रज्ञान दिले पाहिजे ज्या तंत्रज्ञानामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर मात करून त्याला हमखास उत्पन्नाची हमी मिळेल असे प्रतिपादन जैन इरिगेशन जळगावचे संचालक अभय जैन यांनी केले. पवनार येथील प्रगतीशील शेतकरी कुंदन वाघमारे त्यांच्या शेतात आयोजित केळी पीक पाहणी कार्यक्रम व जैन ठिंबक केळी लागवडीचे मार्गदर्शन या मेळाव्यात ते बोलत होते.सर्वप्रथम जैन यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. त्याप्रसंगी उपविभागीय कृषी अधिकारी जी. ्आर.कापसे, मुख्य केळी तज्ज्ञ डॉ. के.व्ही. पाटील, तांदुळवाडी रावेर येथून आलेले कृषीभूषण प्रेमानंद महाजन, प्रशांत महाजन, विनय काकडे, कृषीभूषण डॉ. नंदकिशोर तोटे, शेतकरी कुंदन वाघमारे व्यासपीठावर उपस्थित होते.प्रास्ताविकामध्ये शेतकरी कुंदन वाघमारे यांनी वर्धा, सेलू तालुक्यामध्ये केळी पिकाचे क्षेत्र वाढवून या क्षेत्राला गतवैभव प्राप्त करून देण्याचा संकल्प व्यक्त केला. व सोबतच त्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाने केली. पीक घेतल्यास ते कसे फायद्याचे आहे हे उपस्थित शेतकऱ्यांना पटवून दिले. के.व्ही. पाटील यांनी आपल्या विस्तृत मार्गदर्शनातून केळी पिकाच्या लागवडीचे तंत्र समजावून सांगितले. जगातील ३० टक्के केळीचे उत्पादन एकट्या भारतात असून केळी उत्पादनात भारत हा प्रथम क्रमांकावर आहे. त्यानंतर चीनन, फिसीपाईन्स, इक्विडोर या देशाचा नंबर लागतो. संपूर्ण देशाच्या शेतीला तंत्रज्ञान शिकविणारे पिक म्हणजे केळी असेही ते म्हणाले. साधारणत: केळी हे पीक शास्त्रीय दृष्ट्या १५ ते ४० सेल्सीअंश तापमानात घेता येते. परंतु आधुनिक तंत्रज्ञानाने खानदेश व विदर्भात उन्हाळ्यात असलेल्या ४७ सेल्सीअंश तापमानातही यशस्वीरित्या केली. पीक घेतल्या जाऊ शकते हे सिध्द झाल्याचेही ते म्हणाले. अभय जैन पुढे म्हणाले की, शेतकरी मोठा झाला तरच उद्योजक मोठा होईल. तेव्हा उद्योजकांनी शेतकऱ्याला काय दिले पाहिजे त्याचा विचार होणे गरजेचे आहे. जैन उद्योग समुहाने जेव्हा ठिंबक सिंचन आणले तेव्हा थेंबा थेंबने पीक कसे वाढेल हा संभ्रम शेतकऱ्यांच्या मनात निर्माण झाला होता. परंतु प्रयोगाअंती ते सिध्द झाले व पर्यायाने पाणी समस्येवर मात करणारा पर्याय शोधून राष्ट्रहिताचे कार्य करता आल्याचे ते म्हणाले. मेळाव्याला परिसरातील व जिल्ह्यातील शेकडो शेतकऱ्यांनी हजेरी लावली.
शेतकऱ्यांच्या हाती तंत्रज्ञान दिले पाहिजे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2018 11:54 PM
शेतकऱ्यांच्या हाती असे तंत्रज्ञान दिले पाहिजे ज्या तंत्रज्ञानामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर मात करून त्याला हमखास उत्पन्नाची हमी मिळेल असे प्रतिपादन जैन इरिगेशन जळगावचे संचालक अभय जैन यांनी केले. पवनार येथील प्रगतीशील शेतकरी कुंदन वाघमारे त्यांच्या शेतात आयोजित केळी पीक पाहणी कार्यक्रम व जैन ठिंबक केळी लागवडीचे मार्गदर्शन या मेळाव्यात ते बोलत होते.
ठळक मुद्देअभय जैन : पवनार येथील केळी पीक पाहणी कार्यक्रम