लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : वर्धा जिल्ह्यात गवळाऊ जनावरांच्या संगोपनासाठी पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून जणू लोकचळवळच उभी झाली आहे. ही बाब कौतुकास्पद आहे. निसर्गाच्या लहरीपणाचा वेळोवेळी शेतकऱ्यांना आर्थिक फटक सहन करावा लागत असल्याने त्यांनी पशुसंवर्धनाची कास धरून स्वत:चे उत्पन्न कसे वाढवून घेता येईल यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन पशुसंवर्धन विभागाचे आयुक्त कांतीलाल उमाप यांनी केले. ते कारंजा येथे गवळाऊ जनावरांची प्रदर्शनी व दुग्ध स्पर्धेत मार्गदर्शन करताना बोलत होते.जि.प. पशुसंवर्धन विभाग व पं. स. कारंजा (घा.)च्या संयुक्त विद्यमाने कारंजा येथील नारा टि-पॉर्इंट परिसरात गवळाऊ जनावरांची प्रदर्शनी व दुग्ध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. कार्यक्रम प्रसंगी व्यासपीठावर माजी आमदार दादाराव केचे, जि.प.चे सभापती मुकेश भिसे, अतिरिक्त आयुक्त डॉ. डी. एम. चव्हाण, सुधीर दिवे, जि.प. उपाध्यक्ष कांचन नांदुरकर, जि.प. सभापती निता गजाम, जयश्री गफाट, प्रिया शिंदे, डॉ. किशोर कुमरे, कारंजा पं.स.चे सभापती मंगेश खवशी, उपसभापती रंजना टिपले, सरिता गाखरे, सुरेश खवशी, रेवता धोटे, पं.स सदस्य रोशना ढोबळे, आम्रपाली बागडे, जगदीश डोळे, पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. राजीव भोजने, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. प्रज्ञा गुल्हाणे, डॉ. प्रविण तिखे, डॉ. धपाडे, डॉ. खंडारे, डॉ. अलोणे, डॉ. बी. व्ही. वंजारी आदींची उपस्थिती होती.कार्यक्रमादरम्यान माजी आमदार दादाराव केचे, डॉ. डी. एम. चव्हाण, जि.प. सभापती मुकेश भिसे आदींनी मनोगत व्यक्त केले. सदर पशुप्रदर्शनीमध्ये ३२७ पशुपालकांनी आपली जनावरे आणून सहभाग नोंदविला होता. समारोपीय कार्यक्रमात विजेत्या पशुपालकांना मान्यवरांच्या हस्ते रोख बक्षीस व स्मृती चिन्ह देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. प्रज्ञा गुल्हाणे यांनी केले. संचालन डॉ. बी. व्ही. वंजारी यांनी केले तर आभार डॉ. एम. एस. जोगेकर यांनी मानले.चॅम्पियन आॅफ चॅम्पियनचा बहुमान गोंदियाच्या गायधनेंनाप्रदर्शनीतील नऊ उत्कृष्ट पुरस्कार प्राप्त जनावरांमधुन चॅम्पीयन आॅफ चॅम्पीनयचा बहूमान गोंदीया जिल्ह्यातील शिवनी येथील अशोक गायधने यांच्या मालकीच्या गवळाऊ वळूला देण्यात आला. गवळाऊ वळू गटात प्रथम बक्षीस शिवनी, जि. गोंदीया येथील अशोक गायधने, द्वितीय आर्वी तालुक्यातील दहेगाव गोंडी येथील रुपराव अरगडे तर तृतीय पुरस्कार माळेगाव (ठेका) येथील विनोद येवले यांच्या मालकीच्या जनावराला देण्यात आला. गवळाऊ कालवड गटात प्रथम पुरस्कार वर्धेच्या सचिन अवथळे, दितीय काचनुर येथील शंकर राऊत आणि तृतीय तळेगाव (श्या.पं.) येथील ज्ञानेश्वर गावंडे यांच्या जनावराने पटकाविला. गवळाऊ गाय गटात प्रथम बक्षीस खरांगणा (हेटी) येथील भोजराज अरबट, द्वितीय सावळी (खुर्द) येथील शंकर बारंगे तर तृतीय बोंडसुला येथील शंकर जुगनाके यांना देण्यात आला.तीन सदस्यीय चमुकडून पाहणीसदर पशुप्रदर्शनीत सहभागी झालेल्या जनावरांपैकी उत्कृष्ट जनावर कुणाचे याबाबतचा निर्णय घेण्यासाठी डॉ. प्रमोद शिंदे, डॉ. विजय रहाटे व डॉ. अजय पोहरकर या तज्ज्ञांची तीन सदस्यीय चमू तयार करण्यात आली होती. या समितीने पाहणी करून तीनही गटामधील उत्कृष्ट जनावरांची निवड केली.दुग्ध स्पर्धेत राऊत यांचे जनावर अव्वलजिल्ह्यात यंदा पहिल्यांदाच दुग्ध स्पर्धा घेण्यात आली. यात प्रथम काचनूर येथील देविदास राऊत, द्वितीय किन्हाळा येथील अमित मोरे, तृतीय कन्नमवारग्राम येथील विजय गळहाट, चतृर्थ खैरी पुनर्वसन येथील मंगेश बारंगे येथील मंगेश बारंगे तर पाचवा पुरस्कार कारंजा येथील अमोल अवथळे यांच्या जनावरांनी पटकाविला. या स्पर्धेत एकूण दहा पुरस्कार गोपालकांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
शेतकऱ्यांनी पशुसंवर्धनाची कास धरून स्वत:चे उत्पन्न वाढवावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2018 10:55 PM
वर्धा जिल्ह्यात गवळाऊ जनावरांच्या संगोपनासाठी पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून जणू लोकचळवळच उभी झाली आहे. ही बाब कौतुकास्पद आहे. निसर्गाच्या लहरीपणाचा वेळोवेळी शेतकऱ्यांना आर्थिक फटक सहन करावा लागत असल्याने त्यांनी पशुसंवर्धनाची कास धरून स्वत:चे उत्पन्न कसे वाढवून घेता येईल यासाठी प्रयत्न करावे,....
ठळक मुद्देउमाप : जनावरांची प्रदर्शनी व दुग्ध स्पर्धा