लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यातील सर्व कृषी पंप सौर ऊर्जेवर सुरू करण्यासाठी नियोजन करणे गरजेचे आहे. एकही शेतकरी कृषी पंप वीजजोडणी पासून वंचित राहू नये, तसेच जिल्ह्यात सुरु असलेले अति उच्च दाब विद्युत प्रकल्प जलद गतीने पूर्ण करण्याच्या सुचना खासदार रामदास तडस यांनी महावितरण व महापारेषण आढावा बैठकीमध्ये दिले.वर्धा येथील खासदार रामदास तडस यांच्या जनसंपर्क कार्यालयात महावितरण व महापारेषण कंपनीच्या अधिकाऱ्यासोबत आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीमध्ये महापारेषणच्यावतीने वर्धा जिल्ह्यात चालू असलेल्या प्रकल्पाचा आढावा घेण्यात आला. जिल्ह्यात महापारेषणतर्फे सन २०१४-१५ ते २०१८-१९ पर्यंत १३२/३३ केव्ही उपकेंद्र, द्विपथ वाहिनी, २२० के.व्ही उपकेंद्र, नवीन वीज उपकेंद्र कामावर एकूण ११३.२७ कोटी रुपयांचे कामे पूर्ण झालेली असून ६७.२२ कोटी रुपयाचे कामे प्रगतीपथावर आहे. यामध्ये नवीन उपकेंद्र, नवीन वाहिन्या, द्विपथ वाहिनी, अतिरिक्त रोहित्र असल्याची माहिती महापारेषणच्या उपस्थित अधिकाºयांनी दिली. जिल्ह्यातील महावितरणमार्फत २०१७-२०१८ मार्फत कृषी पंप वीज जोडणीकरिता २७६९ अर्ज प्राप्त झाले आहेत. २७६४ कृषी पंपांना उर्जीकर्ण करण्यात आले. तसेच मे २०१८ पर्यंत प्रलंबित कृषी पंपांची संख्या ३२४९ आहे. धडक सिंचन योजने अंतर्गत कृषी पंप विद्युत पुरवठा करण्याकरिता ५५९० चे उदिष्ठ पैकी अर्ज ४९०४ प्राप्त झाले व लाभार्थ्यांची संख्या ३८४३ आहे. रोहयो योजनेअंतर्गत कृषी पंप विद्युत पुरवठा करण्याकरिता ५३४ चे उदिष्ठ पैकी अर्ज ५२८ प्राप्त झाले व लाभार्थ्यांची संख्या ५२३ आहे. अटल सौर उर्जा कृषी पंपा करिता ५७० पंपाचे उदिष्ठ होते.त्यापैकी ७३७ अर्ज प्राप्त झाले व लाभार्थ्यांची संख्या ४८६ असल्याची माहीती महावितरणच्या अधिकाºयांनी दिली. कारंजा तहसील मधील हेटीकुंडी येथे २२० केव्ही उपकेंद्र व वर्धा मेगा फूड पार्ककरिता ३३/११ केव्ही उपकेंद्राला मंजुरी प्रदान झाल्याची माहिती दिली. प्रत्येक गावामध्ये स्वतंत्र सौर कृषी वाहिन्यांची गरज आहे आणि त्यासाठीचा प्रस्ताव तयार करण्याचे सूचना खा. तडस यांनी दिल्या. गावागावांत शेती पंपाला सौर कृषी वाहिनीच्या माध्यमातून वीज पुरवठा करण्यासाठी तसेच एकही शेतकरी कृषी पंप विद्युत पुरवठ्यापासून वंचित राहणार नाही याकरिता अधिकाऱ्यांनी एकत्रित बसून नियोजन करण्याच्या सूचना खासदारांनी दिल्या. शेतकºयांना सौर उर्जा कृषी पंप घेण्याकरिता व वीज ग्राहकांनी आधुनिकीकरणाचा मार्ग स्वीकारण्याकरिता प्रोत्साहित करावे अशा सूचना खासदार तडस यांनी केल्या. या बैठकीला महावितरणचे अधीक्षक अभियंता सुनील देशपांडे, नागपूर व वर्धा विभाग महापारेषणचे कार्यकारी अभियंता अनिल पाटील, कार्यकारी अभियंता मनीष खत्री, सहायक अभियंता दयानंद धारगावे, महावितरणचे कार्यकारी अभियंता संजय वाकडे, सहायक अभियंता राजेश बाकडे उपस्थित होते.
शेतकरी कृषीपंप व वीजजोडणी पासून वंचित राहू नये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 02, 2018 10:33 PM
जिल्ह्यातील सर्व कृषी पंप सौर ऊर्जेवर सुरू करण्यासाठी नियोजन करणे गरजेचे आहे. एकही शेतकरी कृषी पंप वीजजोडणी पासून वंचित राहू नये, तसेच जिल्ह्यात सुरु असलेले अति उच्च दाब विद्युत प्रकल्प जलद गतीने पूर्ण करण्याच्या सुचना खासदार रामदास तडस यांनी महावितरण व महापारेषण आढावा बैठकीमध्ये दिले.
ठळक मुद्देरामदास तडस यांच्या आढावा बैठकीत सूचना : जिल्ह्यातील विद्युत प्रकल्प जलद गतीने पूर्ण करा