वर्धा : दरवर्षी गुडीपाडव्यापासून शेतात सालगडी कामाला लावले जातात; परंतु दुष्काळी स्थितीमुळे परिसरात हाताला काम नसल्याने अनेकजण तालुक्याच्या ठिकाणी तसेच इतर जिल्ह्यात चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ यासह इतर राज्यात गेले आहेत. यामुळे यंदा सालगडी मिळविण्यासाठी शेतकऱ्यांना गावोगाव शोधमोहीम करावी लागत असल्याचे चित्र आहे. दिवसेंदिवस महागाईत वाढ हाते असून सामान्य जनतेला जीवन जगणे कठीण झाले आहेत. दुष्काळाबरोबरच महागाईचे चटके सर्वच स्तरातील नागरिकांना बसत आहेत. निसर्गाच्या लहरीपणामुळे वेळेवर पाऊस पडत नसल्याने अनेक युवक शेती सोडून रोजगारासाठी शहराकडे जात असल्याचे दिसून येते; परंतु असे शेतकरी अजून आहे की त्यांना शेती सोडता येत नाही. त्यातही मोठ्या शेतकऱ्यांना शेती शिवाय पर्यायच नाही. स्वत: शेती करता येत नाही अश्या शेतकऱ्यांना सालगड्यांच्या भरवश्यावर शेती करावी लागते.गावातील अनेक जण शहरात रोजगारासाठी गेल्याने शेतीसाठी सालगडी कठीण झाले आहे. मराठी नवीन वर्ष म्हणून गुडीपाडव्याला सालगडी कामावर ठेवले जातात. पूर्वी ठराविक रक्कम आणि काही धान्याच्या मोबदल्यात सालगडी ठेवले जात असते. तेव्हा गडी मिळण्यास फारशी अडचण येत नव्हती; परंतु अलिकडच्या काही वर्षांपासून रोजंदारीवर तसेच उघड (गुत्ते) पद्धतीने काम केल्यावर कमी वेळेस जास्त पैसे मिळत असल्याने सालाने काम करण्यात मजूर नकार देतात. तसेच सालात वाढ झाल्याने सालगडी मिळणे अवघड झाले आहे.८०, ८५, ९० हजार रुपये देऊनही सालगडी मिळेणासे झाले आहे. परिणामी पाहुणे, नातेवाईकडे गड्याचे ठेपे शोधण्यासाठी शेतकऱ्यांना गावोगाव फिरून भटकंती करावी लागत आहे. बरेच सालगडी सालाची रक्कम घेतल्यावर मध्येच लग्न, दवाखान्याच्या नावावर पुन्हा मोठ्या रक्कमेची मागणी करतात. उचल देऊनही सालगडी वर्षभर काम करील याची खात्री नसल्याने शेतकरी दुहेरी आर्थिक संकटात सापडतात. शेतीचा खर्च सालगडी लग्नकार्य, दवाखाना, मुलाच शिक्षण, मध्येच अस्मानी संकट उद्भवल्यास शेतकऱ्यांचे पार आर्थिक कंबरडे मोडते. त्यात व्याजाने व कर्ज काढून शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना शेती विकल्याशिवाय पर्याय उरत नाही. अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.(तालुका प्रतिनिधी)नैसर्गिक संकटांची मालिका सुरूच४गत ३-४ वर्षांपासून शेतकऱ्यांवर नैसर्गिक संकटांची मालिकाच सुरू आहे. कधी अवकाळी पाऊस, गारपीट, वादळवारा यामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावला जात आहे. त्यामुळे सर्वसामान्य शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजन बिघडत चालले आहे.४शासनाकडून बी.पी.एल. आणि ए.पी.एल. कार्डधारक मजुरांना राशन दुकानात स्वस्त धान्य मिळत असल्याने तसेच आठवड्यातून २-३ दिवस जरी रोजाने काम केले तरी महिन्याचा खर्च सहज निघत असल्याने कशाला वर्षभर राबायचे असे म्हणत काही जण सालाने काम करण्याचे टाळत आहेत. त्यामुळे अनेक अडचणींना सामोरे जात शेतकऱ्यांना शेतीसाठी सालगडी शोधावे लागत आहेत.
सालगड्याच्या शोधार्थ शेतकऱ्यांची भटकंती
By admin | Published: April 05, 2016 4:40 AM