लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्हा सामान्य रुग्णालयातील २४ सुरक्षा रक्षकांनी आयटकच्या नेतृत्त्वात आपल्या विविध मागण्यांसाठी सोमवारपासून साखळी उपोषण सुरू केले. सदर आंदोलनादरम्यान सहाय्यक कामगार आयुक्तांनी आंदोलनकर्त्यांशी सकारात्मक चर्चा केल्यानंतर आंदोलनकर्त्यांनीही आपले आंदोलन मागे घेतले.शासकीय रुग्णालयात २४ सुरक्षा रक्षक कार्यरत आहेत. परंतु, त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्षच केल्या जात असल्याने २२ एप्रिलपासून साखळी उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला होता. त्याच अनुषंगाने आज जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या आवारात आयटकचे दिलीप उटाणे, सुरेश गोसावी यांच्या नेतृत्त्वात साखळी उपोषण सुरू करण्यात आले.या आंदोलनादरम्यान आंदोलनकर्त्या सुरक्षा रक्षकांच्या विविध मागण्यांवर सहाय्यक कामगार आयुक्त नागपूर यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे सकारात्मक चर्चा झाली. या चर्चेअंती ठोस आश्वासन मिळाल्याने आंदोलनकर्त्या सुरक्षा रक्षकांनी आंदोलन मागे घेतले. या आंदोलनात मोठ्या संख्येने सुरक्षा रक्षक व त्यांचे कुटुंबिय सहभागी झाले होते. या आश्वासनाची पूर्तता केव्हा होते याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.४८ सुरक्षा रक्षकांची होणार नेमणूकजिल्हा सामान्य रुग्णालय वर्धा येथे १२, उपजिल्हा रुग्णालय आर्वी व हिंगणघाट येथे प्रत्येकी सहा तसेच ग्रामीण रुग्णालय पुलगाव, सेलू, वडनेर समुद्रपूर, भिडी, कारंजा, आष्टी, देवळी प्रत्येकी ३ असे एकूण ४८ सुरक्षा रक्षकांची शासन निर्णया नुसार नेमणुक होणार आहे. सध्या वर्धा जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयात केवळ २८ सुरक्षा रक्षक कार्यरत आहेत.
जिल्हा रुग्णालयातील सुरक्षा रक्षकांचे उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2019 9:19 PM
जिल्हा सामान्य रुग्णालयातील २४ सुरक्षा रक्षकांनी आयटकच्या नेतृत्त्वात आपल्या विविध मागण्यांसाठी सोमवारपासून साखळी उपोषण सुरू केले. सदर आंदोलनादरम्यान सहाय्यक कामगार आयुक्तांनी आंदोलनकर्त्यांशी सकारात्मक चर्चा केल्यानंतर आंदोलनकर्त्यांनीही आपले आंदोलन मागे घेतले.
ठळक मुद्देआश्वासनाअंती आंदोलन मागे : कुटुंबीयांसह मैदानात उतरल्यावर घेतली दखल