लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यातील २९४ ग्रा.पं.तील सरपंच आणि ग्रा.पं. सदस्य पदासाठी एकूण ६ हजार ६९९ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. रविवारी निवडणुकीचा एक भाग म्हणून प्रत्यक्ष मतदान घेण्यात आले. सायंकाळी ५.३० पर्यंत सुमारे ७० टक्के ग्रामीण भागातील मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. रविवारी एकूण ६ हजार ६९९ उमेदवारांचे राजकीय भवितव्य मतपेटीत बंद झाले असून कुणाला बहुमताचा कौल मिळाला हे सोमवारी मतमोजणीनंतर स्पष्ट होणार आहे.प्राप्त माहितीनुसार, जिल्ह्यातील चार ग्रा. पं. तील सरपंचासह ग्रा. पं. सदस्यांची अविरोध निवड झाल्यानंतर २९४ ग्रा. पं. तील सरपंच आणि ग्रा. पं. सदस्यांच्या निवडीसाठी रविवारी प्रत्यक्ष मतदान घेण्यात आले. सकाळी ठिक ७.३० वाजता मतदान प्रक्रियेला सुरूवात झाली. सुरूवातीला काही ठिकाणी ईव्हीएम मशीन मध्ये क्षुल्लक तांत्रिक दोष निर्माण झाल्याने मतदान केंद्रांवरील अधिकाऱ्यांसह मतदारांची तारांबळ उडाली होती. परंतु त्यानंतर तज्ज्ञांनी वेळीत मतदान केंद्र गाठून तांत्रिक दोष दूर केले.सकाळी ९.३० वाजेपर्यंत वर्धा तालुक्यात ६.५१ टक्के, देवळी ५.४० टक्के, सेलू १०.७० टक्के, आर्वी ११.१४ टक्के, आष्टी १०.३७ टक्के, कारंजा १२.१४ टक्के, हिंगणघाट ९.७० टक्के तर समुद्रपूर तालुक्यात १२.०६ टक्के मतदान झाले होते. त्यानंतर जसजसा सूर्य डोक्यावर चढत मावळतीला गेला, तसतसे मतदार घराबाहेर पडल्याने मतदानाचा टक्काही वाढत गेला. सकाळी ११.३० वाजेपर्यंत वर्धा तालुक्यात १९.२३ टक्के, देवळी १९.३५ टक्के, सेलू २६.७४ टक्के, आर्वी २७.३४ टक्के, आष्टी २७.४९ टक्के, कारंजा २८.४६ टक्के, हिंगणघाट ३७.९२ टक्के तर समुद्रपूर तालुक्यात ३०.७३ टक्के मतदान झाले होते.तर दुपारी १.३० वाजेपर्यंत वर्धा तालुक्यात ४१.२१ टक्के, देवळी ४३.५२ टक्के, सेलू ४८.७२ टक्के, आर्वी ४८.६० टक्के, आष्टी ४९.३९ टक्के, कारंजा ४७.६२ टक्के, हिंगणघाट ४०.१९ टक्के तर समुद्रपूर तालुक्यात ५२.५४ टक्के मतदान झाले होते. तसेच दुपारी ३.३० वाजेपर्यंत वर्धा तालुक्यात ५०.३३ टक्के, देवळी ५९.२३ टक्के, सेलू ६४.३६ टक्के, आर्वी ६७.०६ टक्के, आष्टी ६७.७४ टक्के, कारंजा ७२.८७ टक्के, हिंगणघाट ५७.४७ टक्के तर समुद्रपूर तालुक्यात ६८.७४ टक्के मतदान झाले होते. सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत किती टक्के मतदान झाले याची जुळवाजुळव वृत्तलिहिस्तोवर सुरू होती. परंतु, मतदानाचा यंदाचा टक्का ७० च्यावर जाईल असा अंदाज निवडणूक विभागातील अधिकाऱ्यांकडून वर्तविला जात होता.जिल्हाधिकाऱ्यांनी मतदान केंद्रांची केली पाहणीरविवारी मतदान प्रक्रिया सुरू असताना याचा आढावा जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांनी यांनी सेलू तालुक्यातील केळझर येथील मतदान केंद्र गाठून जाणला. यावेळी त्यांनी मतदान केंद्रांवरील अधिकाºयांशीही चर्चा केली. उल्लेखनीय म्हणजे, याच गावात प्रचाराची मुदत संपल्यानंतर सरपंचपदासाठी निवडणूक लढत असलेल्या एका उमेदवाराची जाहीर सभा झाली होती. त्यानंतर जिल्हाधिकारी भिमनवार यांनी मतदान केंद्र गाठून तेथील येथील सोई-सुविधांची पाहणी केली आहे.काही ठिकाणी आला होता ईव्हीएममध्ये तांत्रिक बिघाडजिल्ह्यातील १,०३३ मतदार केंद्रांवरून रविवारी मतदान घेण्यात आले. प्रत्यक्ष मतदान सुरू झाल्यानंतर जिल्ह्यातील काही मतदान केंद्रांवरील ईव्हीएम मध्ये क्षुल्लक तांत्रिक बिघाड आला होता. ज्या ठिकाणी बिघाड आला, त्याची माहिती मिळताच तज्ज्ञांच्या चमूने सदर मतदान केंद्र गाठून तांत्रिक दोष दूर केले. देवळी तालुक्यातील विजयगोपाल येथे ईव्हीएम मशीन मध्ये तांत्रिक बिघड आल्याने तेथील मतदान प्रक्रिया सुमारे दीड तासासाठी खोळंबली होती. मशीन बदलविण्यात आल्यानंतर सुरळीत मतदान सुरू झाले. शिवाय देवळी तालुक्यातीलच सुरगाव येथील मतदान केंद्रावरील मशीनमध्ये तांत्रिक बिघाड आल्याने मशीन बदलविण्यात आली. तसेच सेलू तालुक्यातील सूरगाव येथेही तांत्रिक बिघाड आला होता. तो तज्ज्ञांनी तातडीने मतदान केंद्र गाठून दूर केला. वर्धा तालुक्यातील काही मतदान केंद्रावरील ईव्हीएम मशीनमध्ये तांत्रिक दोष आला होता. तो वेळीच तज्ज्ञांनी दूर करून मतदान प्रक्रिया सुरळीत केल्याचे सांगण्यात आले.बोरगावात ६.३० पर्यंत सुरू होते मतदानबोरगाव (मेघे) येथील जि.प. शाळेत सायंकाळी ५.३० च्या पूर्वी मतदानासाठी नागरिकांनी एकच गर्दी केली. शाळेचे मुख्यद्वार ५.३० वाजता बंद झाल्यानंतर आत असलेल्या नागरिकांकडून सायंकाळी ६.३० वाजेपर्यंत मतदान करणे सुरू होते. हिच परिस्थिती समुद्रपूर तालुक्यातील वायगाव (ह.) येथेही होती. तेथेही उशीरापर्यंत मतदान सुरू होते.आचार्य विनोबा भावे यांच्या कर्मभूमीत ७० टक्के मतदानपवनार : शहरानजीकच्या मोठ्या ग्रा.पं.पैकी एक असलेल्या पवनार येथे रविवारी ७० टक्के नागरिकांनी मतदान करून राष्ट्रीय कर्तव्य बजावले. येथे ६ हजार ९०१ मतदारांपैकी ४ हजार ८३१ मतदारांनी मतदान केल्याचे सांगण्यात आले.
६,६९९ उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2019 10:21 PM
जिल्ह्यातील २९४ ग्रा.पं.तील सरपंच आणि ग्रा.पं. सदस्य पदासाठी एकूण ६ हजार ६९९ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. रविवारी निवडणुकीचा एक भाग म्हणून प्रत्यक्ष मतदान घेण्यात आले. सायंकाळी ५.३० पर्यंत सुमारे ७० टक्के ग्रामीण भागातील मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
ठळक मुद्दे२९४ ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक : ७० टक्के मतदान, तालुकास्थळी आज मतमोजणी