आरोपी युवतीबाबत सहानुभूती दाखविण्याची केली मागणी कारंजा (घाडगे) : शहरातील प्रभाग क्रमांक १३ मध्ये रविवारी रात्री बापाच्या जाचाला कंटाळून मुलीने चाकूने वार करून त्याची हत्या केली. या घटनेतील आरोपी युवती तृप्ती रमेश गाडरेकडून हे कृत्य हत्येच्या उद्देशाने नाही तर स्वरक्षणाकरिता तिच्या हातून ते घडल्याचे म्हणत गुरुवारी शहरातील महिलांनी पोलिसांना निवेदन देत तिच्या बाबत सहानुभूती दाखविण्याची मागणी केली. पोलीस निरीक्षक विनोद चौधरी यांना देण्यात आलेल्या निवेदनात महिलांनी घटनेच्या दिवशी मृतक रमेश गाडरे हा मद्यधुंद अवस्थेत घरी आला. तो साहित्याची फेकाफेक करीत होता. शिवाय मुलगी व पत्नी शिवीगाळ करून मारहाण करीत होता व त्यानेच मुलीवर चाकूने हल्ला केला होता. आत्मसरंक्षणात मुलीने बचावाच्या ईराद्याने त्याच्यावर पलटवार केल्याने सदर घटना घडल्याचे म्हटले आहे. याचा विचार करून गुन्हा मागे घ्यावा असे म्हटले आहे. यावेळी निवेदन देतांना परिसरातील महिला मोठया संख्येने उपस्थित होत्या. निवेदन देतेवळी बेबीताई कठाणे, मंगला बुवाडे, उषा मानमोडे, संगीता डोबले, सत्यफुला देशमुख, गिता कामडी, प्रमिला पाठे, सुरेखा एकापुरे, संगीता रमधन, उषा मुळे यांच्यासह शहरातील महिलांची उपस्थिती होती. या निवेदनाबाबत विचार करण्याची मागणीही आली.(शहर प्रतिनिधी)
स्वरक्षणार्थ हातून झाला पित्याचा खून
By admin | Published: July 22, 2016 1:47 AM