जागतिक लोकसंख्या दिनाचा कार्यक्रम : जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाचा उपक्रमलोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाद्वारे जागतिक लोकसंख्या दिनाचे औैचित्य साधून एका मुलींवर कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया करवून घेणाऱ्या २५ दाम्पत्याचा साडीचोळी, शाल व श्रीफळ देवून सत्कार केला. याच कार्यक्रमात कुटुंब कल्याण कार्यक्रमात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या १८२ अधिकारी व कर्मचाऱ्यांचा आरोग्य मित्र गौरव पुरस्कार देवून सत्कार केला. जिल्हा परिषद सभागृहात आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि.प. उपाध्यक्ष कांचन नांदुरकर होत्या. अतिथी म्हणून जि.प. अध्यक्ष नितीन मडावी, आरोग्य व शिक्षण समिती सभापती जयश्री सुनील गफाट यांची उपस्थित होती. प्रमुख पाहुणे म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी नयना गुंडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद पवार, समाजकल्याण सभापती नीता गजाम, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पुरूषोत्तम मडावी, जिल्हा आरोग्य अधिकारी जि.प. डॉ. दुर्योधन चव्हाण, अंकीता सचिन होले, सुरेश मारोतराव खवशी, सुमित्रा मलघाम, अर्चना टोणपे, सुकेशनी धनवीज, उज्वला देशमुख, पंकज सायंकार, सरस्वती राजेंद्र मडावी, विमल वरभे, महेश गौर, चंद्रकला धुर्वे, जयश्री चौखे, माधव चंदनखेडे, मयुरी मसराम, प्रवीण सावरकर, महानंदा ताकसांडे, विद्या भुजाडे, सुनिता अरसड यांची उपस्थिती होती. कायाकल्प पुरस्कार योजनामध्ये सामान्य रुग्णालयाला राज्यात तृतीय पुरस्कार प्राप्त झाल्यामुळे व जिल्ह्यात आरोग्य सेवेत उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल नयना गुंडे यांच्या हस्ते जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पुरूषोत्तम मडावी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दुर्योधन चव्हाण यांचा स्मृतिचिन्ह व प्रशस्तीपत्र देवून गौरव करण्यात आला.जिल्ह्यात कुटूंब कल्याण कार्यक्रमात सर्वाधिक शस्त्रक्रिया करणारे गुणानुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय पुरस्कार डॉ. निरज कदम, डॉ. विनोद बेले, डॉ. अशोक वनकर, भुजलतज्ज्ञ डॉ. प्रशांत बोंडे, डॉ. स्रेहल नाईक, डॉ. प्रविणा मिसाळ, तालुका आरोग्य अधिकारी तालुका सेलू, आर्वी, हिंगणघाट, ग्रामीण रुग्णालय कारंजा, समुद्रपूर, पुलगाव, प्राथमिक आरोग्य केंद्र, हमदापूर, मांडगाव, विजयगोपाल, सालई कला, उपकेंद्र बेनोडा, धनोडी, पेठ व जिल्ह्यातील १६३ उत्कृष्ठ आरोग्य कर्मचाऱ्यांचा आरोग्य मित्र पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.कार्यक्रमात जयश्री गफाट, नयना गुंडे, डॉ. मडावी यांना लोकसंख्या दिनानिमित्त व कुटुंब कल्याणाबाबत मार्गदर्शन केले. प्रास्ताविक डॉ. दुर्योधन चव्हाण यांनी केले. आरोग्य संस्था ही आपली स्वत:ची संस्था आहे, अशी भावना ठेवून कार्य करावे असे मनोगत आपल्या अध्यक्षीय भाषणात कांचन नांदुरकर यांनी व्यक्त केले. संचालन ज्योती भगत यांनी केले तर आभार अतिरिक्त जिल्हा आरोग्य डॉ. अजय डवले यांनी मानले. कार्यक्रमात माताबाल संगोपन अधिकारी डॉ. राज गहलोत, हिवताप अधिकारी डॉ. पी.आर. धाकटे, डॉ. मंगेश रेवतकर, डॉ. लक्षदीप पारेकर, डॉ. विनीत झलके, डॉ. अनुजा बारापात्रे, डॉ. विलास आकरे, सर्व वैद्यकीय अधीक्षक, तालुका आरोग्य अधिकाी उपस्थित होते. कार्यक्रमाकरिता दिलीप रहाटे, विजय जांगडे, हरिष पाटील, रंगराव राठोड, सिद्धार्थ तेलतुबडे, बाबाराव कनेर, उदय साळवे, चंद्रजीत टागोर, कल्पना टोने, गंधे, हरडे, नारायण जवादे, प्रमोद देव, हरिभाऊ पुसनाके, सरला मून, अजय मोहोड यांनी सहकार्य केले.
एका मुलीवर शस्त्रक्रिया करणाऱ्या २५ दाम्पत्यांचा सत्कार
By admin | Published: July 14, 2017 1:28 AM