शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
2
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
3
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
4
Raj Thackeray : ‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
5
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
6
NTPC Green Energy चा IPO १९ नोव्हेंबरला खुला होणार, ग्रे मार्केटमध्ये स्थिती काय?
7
...तर दाढी मिशी काढून मतदारसंघात फिरेन; वडिलांच्या आठवणीत मयुरेश वांजळे भावूक
8
"यांना लाज वाटली पाहिजे"; देवेंद्र फडणवीसांचा चढला पारा, विरोधकांना सुनावलं
9
"शिंदे आणि फडणवीस यांना माहीत झाले आहे की..."; ओवेसींचा महायुतीला टोला
10
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
11
अमित ठाकरेंची कोंडी? सदा सरवणकर थेट पंतप्रधान मोदींना भेटले; वाकून नमस्कार केला अन्...
12
मी माझ्या नुकत्याच जन्मलेल्या बाळाला गमावलं! बॉलिवूड गायकाने सांगितला कठीण काळ, म्हणाला- "त्याचा मृतदेह..."
13
“राजकारण आम्हालाही येते, देवेंद्र फडणवीस गोंधळलेत, त्यांना काहीच माहीत नव्हतं”; संजय राऊतांची टीका
14
Rosmerta Digital Services IPO : उघडण्यापूर्वीच 'हा' IPO पुढे ढकलला, ग्रे मार्केटमध्ये नफ्याचे संकेत; प्राईज बँड ₹१४७, कारण काय?
15
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
16
जया बच्चन यांना हसताना पाहून नेटकरी चकित, आगामी सिनेमाच्या पोस्टरमध्ये वेगळाच लूक
17
अबब! इतक्या मिनिटांचा असणार 'पुष्पा २'चा ट्रेलर; सिनेमाच्या टीमने दिली मोठी माहिती
18
'डायरिया असताना पावसात शूट केलं रोमँटिक गाणं, वॉशरुमही...' मिनाक्षी शेषाद्रीने सांगितली आठवण
19
Zomato १ अब्ज डॉलर्सचा QIP लाँच करण्याची शक्यता, पाहा काय आहे कंपनीचा प्लान?
20
Maharashtra Election 2024 Live Updates: आमची सत्ता आल्यावर दिशा सालियान प्रकरणाची पुन्हा चौकशी लावणार: रामदास कदम

एकांकिका महोत्सवाला नाट्यरसिकांची भरभरून दाद

By admin | Published: March 20, 2017 12:42 AM

महाराष्ट्र राज्याच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाद्वारे सावंगी येथील दत्ता मेघे आयुर्विज्ञान अभिमत

‘श्यामची आई’ ने स्पर्धेला प्रारंभ : शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाचा उपक्रम वर्धा : महाराष्ट्र राज्याच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाद्वारे सावंगी येथील दत्ता मेघे आयुर्विज्ञान अभिमत विद्यापीठाच्या सभागृहात आयोजित महाएकांकिका महोत्सवाला नाट्यरसिकांनी भरभरून दाद देत आपल्या पसंतीची पावती दिली. या नाट्यमहोत्सवाला वर्धेकरांनी चांगलीच गर्दी केली आहे. या महोत्सवात राज्यातील पुरस्कारप्राप्त सहा एकांकिकांचा सहभाग आहे. या महोत्सवाचे उद्घाटन सावंगीच्या आयुर्विज्ञान अभिमत विद्यापीठाचे कुलपती, माजी खासदार दत्ता मेघे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक व अभिनेते योगेश सोमण, श्रीनिवास नार्वेकर, हरीश इथापे, सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे अधीक्षक अंकुश भगत, महोत्सवाचे समन्वयक संजय इंगळे तिगावकर, विनायक सैद, अजिंक्य भोसले, अभ्युदय मेघे यांची उपस्थिती होती. महोत्सवाची सुरुवात सिडनहॅम महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या ‘श्यामची आई’ या एकांकिकेने झाली. स्वप्नील जाधव लिखित व स्वप्नील बोरस्कर दिग्दर्शित या एकांकिकेतून मुंबईसारख्या महानगरीय जीवनातील मुलगा आणि म्हातारी विधवा आई यांच्या नात्यातील घुसमट अत्यंत प्रभावीपणे सादर झाली. नव्या काळातील ‘श्यामची आई’ हास्याची पेरणी करतानाच उपस्थितांना अस्वस्थही करून गेली. त्यापाठोपाठ सादर झालेली अहमदनगर येथील निर्मिती रंगमंच प्रस्तुत ‘खटारा’ ही एकांकिका शेतकऱ्यांची व्यथा मांडत परिस्थितीशी लढण्याचा आणि परिवर्तनाचा संदेश देऊन गेली. लेखक व दिग्दर्शक अमोल साळवे यांनी ग्रामीण वारसा जोपासण्याचे आवाहनच या नाट्यकृतीतून केले आहे. रंगमंचावरील नेपथ्य आणि प्रकाशयोजनाही दाद मिळवून गेली. तर अमरावतीच्या स्पंदन परिवार प्रस्तुत व गणेश वानखेडे लिखित, दिग्दर्शित ‘चौदा एप्रिलची रात्र’ या एकांकिकेतून प्रतिमा पूजनाऐवजी वैचारिक अनुकरणाचा जागर करण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने उत्सव साजरे करीत असताना त्यांच्या मूळ विचारापासून दूर जाऊ नका, असा संदेशच या एकांकिकेतून देण्यात आला. या तीनही एकांकिका प्रेक्षकांना अंतर्मुख करून गेल्या. महोत्सवाच्या पहिल्याच दिवशी वर्धेकर रसिकांनी उपस्थित राहून उर्त्स्फूत दाद देत नाट्यप्रेमाचा परिचय दिला.(प्रतिनिधी)