लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : विविधामध्ये कार्यरत एजंटच्या अंगावर पेट्रोल ओतून त्याला जाळण्याची धमकी देण्यात आली. ही घटना मंगळवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास विविधा केंद्रात घडली. या प्रकरणी शहर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.प्रशांत मोकाशे (४३) हे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील विविधा केंद्रात एजंट म्हणून काम करतात. या ठिकाणी गौतम एजन्सीकडून काम करणाºया एका व्यक्तीशी त्यांचा जुना वाद होता. याबाबत पोलिसांत तक्रारही करण्यात आली होती. याच वादातून मंगळवारी सदर इसमाने प्रशांत यांच्या अंगावर रॉकेल ओतले. यानंतर शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी दिली. याबाबत प्रशांत मोकाशे यांनी शहर पोलिसांना माहिती दिली. यावरून ठाणेदार चंद्रकांत मदने यांनी ताफ्यासह घटनास्थळाची पाहणी केली. तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.
अंगावर पेट्रोल ओतून दाखविली भीती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2017 12:37 AM
विविधामध्ये कार्यरत एजंटच्या अंगावर पेट्रोल ओतून त्याला जाळण्याची धमकी देण्यात आली. ही घटना मंगळवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास विविधा केंद्रात घडली.
ठळक मुद्देविविधातील एजंटाचा प्रकार : शहर पोलिसात तक्रार