रामनगर पोलिसात तक्रारवर्धा : कारंजा पोलीस ठाण्यात शिपाई म्हणून कार्यरत पुनम अमोल बहादुरे (उईके) (२९) या बेपत्ता झाल्याची तक्रार पती अमोल बहादुरे यांनी रामनगर पोलिसात दिली. तक्रार देत इतर नातेवाईकाकडे शोध घेऊनही पुनमचा शोध लागला नाही. पुनमचा शोध घेण्यात पोलिसांनी सहकार्य करावे, अशी मागणी त्यांनी एसपींना निवेदनातून केली आहे. कारंजा ठाण्यातून कामानिमित्त आली होती वर्धेलावर्धा : महिला पोलीस शिपाई पुनम बहादुरे (उईके) या १४ फेब्रुवारी २०१७ रोजी कारंजा पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलीस निरीक्षक पुनम गोरडे यांच्यासोबत वर्धा येथील बालसुधार गृहात काही अल्पवयीन आरोपींना घेवून आल्या होत्या. अल्पवयीन मुलांना त्यांनी वर्धेच्या बालसुधार गृहात दाखल केल्यानंतर पुनम बहादुरे (उईके) या त्याच दिवशी सायंकाळी स्थानिक आर्वी नाका येथे उतरल्या आणि त्यांनी गोरडे यांना आपण उद्याला कारंजा येथे येईल असे सांगितल्याचे गोरडे यांनी अमोलला सांगितले. तेव्हापासून पुनम बहादुरे (उईके) यांचा मोबाईलही बंद आहे. तसेच त्या घरीही परतल्या नाही.पुनम बहादुरे (उईके) यांच्या शोधार्थ नातेवाईकांकडे व तिच्या मित्र-मैत्रिनीकडे विचारा केली. परंतु, कुठलाही सुगावा लागला नाही. शेवटी या प्रकरणी १७ फेब्रुवारी २०१७ ला रामनगर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली.तक्रारीची नोंद रामनगर पोलिसांनी घेतली आहे. परंतु, अद्यापही पोलिसांना तिचा शोध लावण्यात यश आले नाह. तक्रारीलाही बराच कालावधी झाला तरी पुनम बहादुरे (उईके) यांचा शोध लागलेला नाही. बेपत्ता असलेल्या पुनमच्या शोधाकरिता योग्य कारवाई करण्यात यावी, अशी मागणी पोलीस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनातून पती अमोल बहादुरे यांनी केली आहे.(शहर प्रतिनिधी)
कारंजा पोलीस ठाण्यातील महिला कर्मचारी बेपत्ता
By admin | Published: March 21, 2017 1:13 AM