लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : गत खरीपात बीटी कपाशीवर आलेल्या बोंडअळीने सर्वांना जेरीस आणले. यामुळे यंदा बीटी बियाणे खरेदी करताना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला देण्यात आला आहे. कृषी विभागाने केलेल्या सर्व्हेनुसार बाजारात बोगस बीटी बियाणे दाखल झाले आहेत. ते महाशक्ती आर.आर. किंवा बी.जी.-३ या नावाने विकण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे अशा बोगस बियाण्यांपासून शेतकऱ्यांना सावध राहण्याचे आवाहन जिल्हा कृषी विकास अधिकाऱ्यांनी केली आहे.कोणत्याही प्रकारची चाचणी न होता, असे बियाणे बाजारात आलेले असते. त्यामुळे अशा बियाण्यापासून शेतकऱ्यांचे नुकसान होते. अशा अनधिकृत बियाण्याचे कोणतेही देयक किंवा परवाना नसतो. त्यामुळे शेतकºयांना अशा बोगस बियाण्यामुळे नुकसान झाल्यास कोणतीही नुकसान भरपाई शासनामार्फत देण्यात येत नाही.शेतकºयांनी बियाणे खरेदी करताना अधिकृत परवाना असणाºया कृषी सेवा केंद्रातूनच बियाणे खरेदी करावे. खरेदी करताना खरेदीची पावती, पिशवी, टँग इत्यादी जपून ठेवावे. पॉकिटावर लॉट नंबर, अंतिम मुदत, उगवन शक्ती इत्यादी बाबी तपासून घ्याव्यात. बियाणे योग्य असल्याबाबत खात्री करावी. बोगस बियाणे विक्री करीत असल्याची माहिती मिळताच कृषी विभागाशी संपर्क साधावा असे जिल्हा कृषी विकास अधिकाऱ्यांनी कळविले आहे.शेतकऱ्यांनी रासायनिक खते व बियाणे खरेदी करताना घ्यावयाची काळजीशेतकऱ्यांनी रासायनिक खत, बियाणे व किटकनाशक खरेदी करताना फसवणूक होऊ नये यासाठी शासन मान्यता कृषी निविष्ठाचा विक्री परवाना असलेल्या कृषी केंद्रातूनच रासायनिक खते, बियाणे व किटकनाशके खरेदी करावी, असे आवाहन जिल्हा कृषी विकास अधिकारी यांनी केले आहे.बोगस व बेकायदेशीर बियाणे म्हणजे काय ?ज्या बियाण्याच्या उत्पादनास व विक्रीस शासनाची परवानगी नसणे, बियाण्याचे उत्पन्नासंबंधी खोटे दावे करून शेतकऱ्यांना आमिष दाखविण्यात येते. बियाण्यांच्या व्यवहारामध्ये शासनमान्य दराने बिल शेतकऱ्यास दिले जात नाही. बियाण्याच्या पाकिटावर बियाण्याच्या गुणवत्तेचा तपशील व कोणत्याही तंत्रज्ञानाचा उल्लेख नसतो. बियाण्याच्या परीक्षणापूर्व वापरामुळे जमिनीवर तथा पर्यावरणावर विपरीत परिणाम होऊ शकतो. अशा अनधिकृत बियाण्याच्या वापरामुळे जर शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले तर त्यासाठी नुकसान भरपाईची हमी शासन वा ग्राहक मंचसुद्धा घेऊ शकत नाही.खरेदी करताना घेण्याच्या काळजीसंदर्भात कृषी अधिकाऱ्यांचे निर्देशकुठलेही रासायनिक खत, बियाणे व किटकनाशक अधिकृत व परवानाधारक विक्रेत्याकडूनच खरेदी करावे. खरेदी करताना पक्क्याबिलाचा आग्रह करावा. पक्के बिल देण्यास नकार दिल्यास कृषी विभागाशी संपर्क साधावा तक्रार नोंदवाावी. बिलावरखरेदी केलेल्या बियाण्याच्या गुणवत्तेचा संपूर्ण तपशील नोंदविलेला आहे किंवा नाही याची खात्री करावी. खरेदी केलेल्या बियाण्याचे पाकिट सिलबंद, माहोरबंद तथा लेबलसह असल्याची खात्री करावी. बियाणे उगवण क्षमतेची अंतीम तारीख पाहूनच पाकीट व बॅग खरेदी करावी. बियाणे उत्पादित किमतीपेक्षा जास्त किमतीने विक्री करीत आढळल्यास त्वरीत दाखल करावी. सध्यास्थितीत जिल्ह्यामध्ये सर्व प्रकारचे बियाणे व खते मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. शेतकऱ्यांनी विशिष्ट वाणांचा तुटवडा असल्याचा अफवांवर विश्वास ठेऊ नये. कोणत्याही अपप्रचावर विश्वास न ठेवता परवानाधारक विक्रेत्यांकडूनच कृषी निविष्ठा खरेदी कराव्यात.
बोगस बियाणे दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 07, 2018 11:23 PM
गत खरीपात बीटी कपाशीवर आलेल्या बोंडअळीने सर्वांना जेरीस आणले. यामुळे यंदा बीटी बियाणे खरेदी करताना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
ठळक मुद्देकृषी विभागाकडून सावधानतेचा इशारा