लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्हा परिषद आरोग्य विभागातील कर्मचऱ्यांच्या मागण्या बाबत जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या कक्षात शुक्रवारी महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद आरोग्य कर्मचारी संघटना प्रतिनिधींची बैठक घेण्यात आली. यावेळी रिक्त पदाच्या घोळावर चर्चा झाली. ही रिक्त पदे लवकरच भरण्यात येतील असे आश्वासन जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी संघटनेला दिले.आरोग्य कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर २९ एप्रिल १७ रोजी सभा घेण्यात आली होती. त्यात दिलेल्या आश्वासनाची पुर्तता झाली नसल्याचे संघटना प्रतिनीधीनी नाराजी व्यक्त केली. गत सभेतील मागण्या प्रथम सोडवा अशी मागणी यावेळी करण्यात आली. आरोग्य कर्मचाऱ्यांच्या पदाचा घोळ कायम असल्याचे प्रशासकीय अधिकारी यांनी मान्य केले. जिल्हा कार्यालयामुळे आरोग्य विभागातील रिक्त पदे कायम आहेत. साहूर प्राथमिक आरोग्य केंद्रात १६ पैकी नऊ पदे रिक्त आहेत. हिच स्थिती जिल्ह्यात आहे.पदाचा घोळ लवकरच दूर करणार असे आश्वासन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अजय डवले यांनी दिले. १५ दिवसात मागण्या निकाली काढण्यात येतील असे सांगितले. सभेत आकृतीबंधानुरार आरोग्य कर्मचाऱ्यांचा पदाचा घोळ (आरोग्य सेवक, पर्यवेक्षक आरोग्य सहाय्यक पुरुष व महिला) दुरूस्त करण्याची मागणी करण्यात आली. प्राथमिक आरोग्य केंद्र गौळ येथील कर्मचाऱ्यांचा भविष्य निवार्ह निधी व एलआयसी हप्ते वेतनातून कपात करण्यात आले; परंतु कर्मचाऱ्यांच्या खात्यावर कनिष्ठ लिपीक राजेन्द खोपे यांनी जमा केले नाही. तक्रार करून दोन वर्षांपासून कार्यवाही झाली नाही. त्यामुळे कर्मचारी १५ दिवसांनी जिप. समोर उपोषण करतील असे संघटनेने सांगीतले.कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती लाभ आदेश होवून लागू नाही, आरोग्य सेविका अंजली डेकाटे यांची पदोन्नती, २००५ नंतर लागलेल्या आरोग्य कर्मचारी व औषध निर्माण अधिकारी यांच्या वेतनातून अंशदायी पेंन्शन हप्ते कपात, आरोग्य सेवक, सेविका बंधपत्रित सेवेची सेवा समायोजन करणे बाबत यावेळी चर्चा करण्यात आली. याशिवाय अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली
आरोग्य विभागातील रिक्त पदे भरणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 05, 2018 11:50 PM
जिल्हा परिषद आरोग्य विभागातील कर्मचऱ्यांच्या मागण्या बाबत जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या कक्षात शुक्रवारी महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद आरोग्य कर्मचारी संघटना प्रतिनिधींची बैठक घेण्यात आली. यावेळी रिक्त पदाच्या घोळावर चर्चा झाली.
ठळक मुद्देअजय डवले यांचे आश्वासन : संघटनांसोबत चर्चा