लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शिक्षणाधिकारी (माध्य.) व वेतन अधीक्षक ही रिक्त पदे तवरित भरण्यात यावीत. जिल्ह्यातील शिक्षण विभागाने नियुक्ती मान्यता दिलेल्या शिक्षकांना शालार्थ अभिलाभामध्ये रूजू करून घ्यावे. संस्थेद्वारे नियुक्त शिक्षकांना मान्यता द्यावी आदी मागण्या म.रा. शिक्षक परिषदेने केल्या. याबाबत कर्जमाफी योजनेच्या शुभारंभासाठी वर्धेत आलेले राज्याचे शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांना विकास भवन येथे देण्यात आले.म.रा. शिक्षक परिषदेचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष प्रवीण भोयर यांनी ना. तावडे यांची भेट घेत चर्चा केली. यावेळी नागपूर विभागाचे सहकार्यवाह अजय वानखडे व शिष्टमंडळ होते. याप्रसंगी ६ ते ८ विभागात समावेश केलेल्या विशेष कला व क्रीडा शिक्षकांना त्यांच्या ९ ते १० मधील तासिकांच्या कार्यभारापासून वंचित ठेऊ नये. याबाबत शासनाने न्यायस्थ भूमिका घ्यावी, अशी आग्रही भूमिका मांडली. यासह वरिष्ठ व निवडश्रेणी विषयी जाचक अटी कमी करून सरसकट सर्वांना ती वेतनश्रेणी देण्यात यावी. सातवा वेतन आयोग त्वरित सुरू करावा आदी मागण्याही लावून धरण्यात आल्यात. यावेळी खा. रामदास तडस, आ. अनिल सोले, आ.डॉ.पंकज भोयर तथा परिषदेचे प्रवीण भोयर, सुरेश रोठे, दीपक ढगे, सुधीर राठोड, विरेंद्र कडू, गजानन वसू, चंद्रकांत ठाकरे, विठ्ठल धोटे, प्रदीप झलके, पवन निनावे, सतीश झाडे, मनोहर कोल्हे, प्रमोद गुडधे, अनिल चौधरी आदी उपस्थित होते.समस्या सोडविण्याची ग्वाहीमागण्या बघून त्यावर त्वरित निर्णय घेण्याचे आश्वासन शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी दिले. शिवाय संघटनेच्या शिष्टमंडळाला मुंबईला येण्याचे आवाहन केले. याबाबत म.रा. शिक्षक परिषदेने समाधान व्यक्त केले.
शिक्षण विभागातील रिक्त पदे त्वरित भरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2017 10:58 PM
शिक्षणाधिकारी (माध्य.) व वेतन अधीक्षक ही रिक्त पदे तवरित भरण्यात यावीत. जिल्ह्यातील शिक्षण विभागाने नियुक्ती मान्यता दिलेल्या शिक्षकांना शालार्थ अभिलाभामध्ये रूजू करून घ्यावे.
ठळक मुद्देशिक्षक परिषदेचे शिक्षणमंत्र्यांना साकडे