शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: विधानसभेच्या मतमोजणीला सुरुवात; काही मतदारसंघातील कल हाती!
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results: निकालापूर्वीच शरद पवार-उद्धव ठाकरेंचं सावध पाऊल; दगाफटका टाळण्यासाठी महत्त्वाचा निर्णय!
3
पोस्टल मतदानात युगेंद्र पवार आघाडीवर; बारामतीत काय होणार? सर्वांचे लक्ष लागले
4
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 ५१ मतदारसंघात एकनाथ शिंदे- उद्धव ठाकरे आमनेसामने; खरी शिवसेना कुणाची जनता ठरवणार
5
पुन्हा २३ नोव्हेंबर! आताही असेच काही घडले तर?
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
7
'शाका लाका बूम बूम' फेम संजू अडकला लग्नाच्या बेडीत, मराठी पद्धतीने पार पडला विवाहसोहळा
8
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
9
जगभर : ‘चिरतरुण’ होण्यासाठी चरबीचं ‘इंजेक्शन’!
10
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
11
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
12
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
13
विशेष लेख: ‘प्रोजेक्ट गॅदर’ : एकटेपणावर ‘अमेरिकन’ उपाय
14
अमोल पालेकर नावाच्या ‘थोड्याशा रुमानी’ ‘आक्रिता’ची कहाणी
15
"शेवटचे मत मोजेपर्यंत मोजणी केंद्र सोडू नका, निवडून आल्यावर थेट मुंबईला या"
16
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
17
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
18
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
19
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई

परमधाम आश्रमात मित्र मिलन सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2019 6:00 AM

विनोबांचे हे १२५ वे जयंती पर्व असल्याने यावर्षीच्या मित्र मिलन सोहळ्याचे मोठ्या प्रमाणात आयोजन करण्यात आले आहे. या मित्र मिलन सोहळ्यास काश्मीर ते कन्याकुमारीपासून १५१ जय जगत मैत्री यात्रा येणार असून या माध्यमातून विविधतेतून एकतेचे दर्शन घडणार आहे. सोहळ्याचे मुख्य आकर्षण पूज्य श्री मुरारी बापू, स्वामी सामदोंग रिन्पोछे, स्वामी चिदानंद सरस्वती हे असून या सत्रात मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देदेशभरातून प्रतिनिधी होणार सहभागी : विविध क्षेत्रातील मान्यवरांची कार्यक्रमाला राहणार हजेरी

लोकमत न्यूज नेटवर्कपवनार : आचार्य विनोबा भावे यांच्या १२५ वी जयंती पर्व व ३८ वा ब्रह्मनिर्वाण सोहळा १५, १६ व १७ नोव्हेंबरला ब्रह्म विद्या मंदिर परमधाम आश्रम, पवनार येथे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात देशभरातून प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. त्यासाठीची तयारी अंतीमटप्प्यात आली आहे.शुक्रवार १५ रोजी पहाटे ४ ते ५ वाजता जागरण, प्रार्थना, जय जगत समाधी प्रदक्षिणा, सकाळी ९ ते १०.३० स्तुती भजन, श्रद्धांजली, स्वागत व संमेलनाची रूपरेखा शाली बहन सादर करतील. ११ ते १२.३० दरम्यान श्री बाल विजयजी यांचे प्रबोधन, संपूर्ण विनोबा या विषयावर पराग भार्इंचे विचार पुष्प, विनोबा, सत्याग्रह या विषयावर बिहार विद्यापिठाचे माजी कुलगुरू सुदर्शन अटांगार यांचे अनुभव, पुस्तका प्रकाशन व १२५ व्या जयंती पर्वावर मित्र मिलनाचा विस्तार रमेश भाई (शहाजहारपूर) हे करतील. तर दुपारच्या सत्रात विनोबा, भूदान, ग्रामदान, ग्राम स्वराज्य, बागी समर्पण, शांती सेना या विषयावर एस. एन. सुब्बाराव, राम सिंदजी (बिहार), शंकर सान्याल (हरिजन सेवा मंडळ दिल्ली), पी.व्ही. राजगोपाल (जय जगत यात्रा प्रमुख, तपरेश्वर भाई (भूदान चळवळ, बिहार), सुभाष शर्मा (जैविक शेती प्रणेते), डॉ. विभा गुप्ता वर्धा, करूणा बहन (ब्रह्म विद्या मंदिर), आदित्य पटनाईक (ओरीसा), प्रोफेसर पुष्पेंद्र दुबे (इंदौर), लक्ष्मीदास भाई (उपाध्यक्ष हरिजन सेवक संघ दिल्ली) हे विचार व्यक्त करतील. शनिवार १६ रोजी सोहळ्याचे मुख्य आकर्षण पूज्य मुरारी बापू असून ते विनोबा विचारावर प्रवचन करतील. गौतम बजाज (ब्रह्म विद्या मंदिर), उच्च न्यायालय मुंबईचे न्यायाधीश सत्यरंजन धर्माधिकारी हेही विचार मांडणार आहेत. तर दुपारच्या सत्रात पुज्य विनोबा व सर्वोदय विचार कार्य, अनुभव या विषयावर जोत्सना बहन, मिलिंद बोकील, राज्यपाल आनंदीबेन पटेल यांची कन्या अनार बहर पटेल, अमिला बहन (उ.प्र.), प्रोफेसर गिता मेहता, सुप्रिया पाठक, अमरनाथ भाई, राजेंद्रसिंहजी (जलतज्ञ), मोहनभाई (लेखा मेंढा) हे मार्गदर्शन करणार आहेत. तर १७ रोजी प्रथम सत्रात उषा बहन सत्संग प्रवचन करतील तर विनोबा, साम्ययोग, शिक्षण विचार, सर्वधर्म समभाव, अध्यात्मक विज्ञान या विषयावर कंचन बहन (ब्रह्म विद्या मंदिर), स्वामी रामदोंग (रेन्पोछेजी माजी पंतप्रधान तिबेट तथा सारनाथ विद्यापीठाचे उपकुलगुरू), स्वामी चिदानन्द सरस्वतीजी (परमार्थ निकेतन ऋषीकेश), हेमभाई मार्गदर्शन करतील.जय जगत मैत्री यात्रेतून घडणार विविधतेतून एकतेचे दर्शनविनोबांचे हे १२५ वे जयंती पर्व असल्याने यावर्षीच्या मित्र मिलन सोहळ्याचे मोठ्या प्रमाणात आयोजन करण्यात आले आहे. या मित्र मिलन सोहळ्यास काश्मीर ते कन्याकुमारीपासून १५१ जय जगत मैत्री यात्रा येणार असून या माध्यमातून विविधतेतून एकतेचे दर्शन घडणार आहे. सोहळ्याचे मुख्य आकर्षण पूज्य श्री मुरारी बापू, स्वामी सामदोंग रिन्पोछे, स्वामी चिदानंद सरस्वती हे असून या सत्रात मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. शहाजहानपूर वरून आपल्या चमूसह आलेले रमेशभाई हे पाहुण्यांची भोजन व्यवस्था पाहात असून जय जगत मैत्री यात्रेचे संपूर्ण नियोजन रमेशभाईनी केल्याचे ज्योती बहन यांनी सांगितले. जय जगत मैत्री यात्रा १४ रोजी सकाळी १० वाजता पवनारात दाखल होणार आहे. या यात्रेचे ग्रा.पं.च्यावतीने स्वागत केले जाणार आहे.

टॅग्स :Vinoba Bhaveविनोबा भावे