लोकमत न्यूज नेटवर्कआर्वी : नजीकच्या सावळापूर येथील नागरिकांनी ग्रा.पं.च्या मनमर्जी कारभारावर भ्रष्टाचाराचा ठपका ठेऊन १० जून पासून बेमुदत उपोषण सुरू केले. याच उपोषणाची सांगता शुक्रवारी माजी आमदार दादाराव केचे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात झाली. माजी आमदार दादाराव केचे यांच्या मध्यस्तीअंती दोषींवर कठोर कारवाईचे आश्वासन संबंधित अधिकाऱ्यांकडून मिळाल्याने हे उपोषण मागे घेण्यात आले आहे.सावळापूर येथील पेव्हर ब्लॉक व स्मशानभूमीच्या रस्ता कामात झालेल्या गैरप्रकाराच्या विरोधात तसेच सदर प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन सुरू करण्यात आले होते. सरपंच व ग्रामसेवक यांनी साटलोट करून शासनाचा १४ व्या वित्त आयोगातून पेव्हर ब्लॉक लावण्यासाठी उपलब्ध करून दिलेल्या निधीत गैरप्रकार केल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांचा आहे. भ्रष्टाचाऱ्यांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी सावळापुरात आंदोलन सुरू असल्याची माहिती मिळताच माजी आमदार दादाराव केचे यांनी उपोषण मंडपाला भेट दिली. शिवाय आंदोलनकर्त्यांचे म्हणणे जाणून घेतले. त्यानंतर त्यांनी संबंधित अधिकाºयांची भ्रमणध्वनीवर चर्चा करून आंदोलनकर्त्यांचा मागण्या निकाली काढण्याच्या विषयाचा पाठपुरावा केला. त्यानंतर उपमुख्य कार्यकारी अधिकाºयांच्या सूचनेवरून सहायक गटविकास अधिकारी अनिल गावंडे यांनी उपोषण मंडप गाठून आंदोलनकर्त्यांच्या मागण्या जाणून घेतल्या. शिवाय सदर मागण्यांवर सहानुभूतीपूर्वक विचार करून योग्य कार्यवाहीचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलनकर्त्यांनी आपले आंदोलन मागे घेतले. या आंदोलनात मुकुंद गायकवाड, शुभम गजभिये, रामेश्वर डेहनकर, माणिक सोमकुंवर, अजय मेश्राम, आकाश भोंगाडे, देविदास आत्राम, सुनील तुमडाम, मंदा मसराम, सुनीता बन्सोड, प्रिया मेश्राम यांचा सहभाग होता.कोणतेही काम नियम बाह्य झालेले नाही. शासकीय अभियंत्यांच्या देखरेखीत कामे झाली. आमच्यावर होणारे आरोप खोटे आहेत. शिवाय राजकीय आणि सूड भावनेतून केलेले आहेत. माझ्यासह ग्रा.पं. सचिवही यात निर्दोष आहेत.- भारती सोमकुंवर, सरपंच, सावळापूर.
अखेर सावळापूरवासीयांनी उपोषण घेतले मागे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2019 9:42 PM
नजीकच्या सावळापूर येथील नागरिकांनी ग्रा.पं.च्या मनमर्जी कारभारावर भ्रष्टाचाराचा ठपका ठेऊन १० जून पासून बेमुदत उपोषण सुरू केले. याच उपोषणाची सांगता शुक्रवारी माजी आमदार दादाराव केचे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात झाली.
ठळक मुद्देमाजी आमदारांच्या पुढाकारानंतर सांगता