शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआकडून लाडकी बहीण योजनेच्या कालावधीबाबत शंका; देवेंद्र फडणवीस ठामपणे म्हणाले...
2
भारतविरोधी षड्यंत्रात काँग्रेस सामील; समाजाला कमकुवत करण्याचा प्रयत्न, PM मोदींचा घणाघात
3
भक्तांसाठी आनंदाची बातमी: निमगाव खंडोबा क्षेत्र विकासासाठी २४ एकर जमीन; शासन निर्णय जारी 
4
"सकाळी नऊ वाजताचा भोंगा, रात्रीच तयारी करून बसला होता"; फडणवीसांनी राऊतांना डिवचलं
5
धक्कादायक! प्रेमाच्या त्रिकोणातून तरुणीने केली तरुणीची हत्या
6
"खोट्याच्या कडू घोटावर विकासाची गॅरंटी भारी पडली’’, हरयाणातील विजयानंतर मोदींचा टोला 
7
वडील-काकाची दहशतवाद्यांनी केलेली हत्या; मुस्लिमबहुल मतदारसंघातून शगुन परिहार विजयी
8
"हरयाणात भाजपा EVMमध्ये छेडछाड करून जिंकला, हा निकाल मान्य नाही’’, काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया
9
हरयाणात झाली रोमांचक लढत, अवघ्या ३२ मतांनी फैसला, अखेरीस जिंकलं कोण? पाहा 
10
"...यामुळेच हा ऐतिहासिक विजय झाला"; हरयाणाच्या निकालावर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया
11
Haryana Assembly Election Results 2024 : दिल्लीच्या जवळपास कमळाची कमाल, आम आदमी पार्टी बेहाल; डिपॉझिटही वाचलं नाही!
12
J&K मध्ये फुटीरतावादाचा सुपडा साफ, एआयपी आणि जमात-ए-इस्लामीला मतदारांनी नाकारले
13
हरयाणा निवडणुकीचे 'मॅन ऑफ मॅच' ठरलेल्या CM नायबसिंग सैनी यांची संपत्ती किती?
14
Ola नंतर Ather नं इलेक्ट्रिक स्कूटरच्या किंमती केल्या कमी, आता स्वस्तात खरेदी करण्याची संधी!
15
जुन्नरमध्ये आयात उमेदवाराच्या हाती तुतारी दिल्यास बंड अटळ?; मविआतील नाराज निष्ठावंतांच्या गोटात हालचालींना वेग
16
गेल्या महिन्यात कोणत्या कंपनीनं सर्वाधिक विकल्या Electric Scooters?
17
"महाराष्ट्रातील जनताही अशा फेक..."; हरयाणातील निकालानंतर CM शिंदेंचा MVA वर 'वार'
18
"आपण तर खरोखरच मोठी 'पनौती' निघालात, हुड्डांनाही..."; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा राहुल गांधींवर निशाणा
19
बुलेट ट्रेन जितकी खास, तितकीच स्टेशनही... वीज बचत अन् प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य!
20
नायब सिंह सैनींनी मारली बाजी; विजयादशमीला घेऊ शकतात मुख्यमंत्रीपदाची शपथ?

अखेर ग्रामपंचायतीने खुले केले विद्यार्थ्यांसाठी अभ्यास केंद्र

By admin | Published: July 13, 2017 1:00 AM

ग्रामविकास आराखड्यातून येथे बांधण्यात आलेले अभ्यासकेंद्र विद्यार्थ्यांना अभ्यासाकरिता खुले करून देण्याऐवजी

ठिय्या आंदोलनानंतर कारवाई : युवकांनी घेतला पुढाकार लोकमत न्यूज नेटवर्क गिरड : ग्रामविकास आराखड्यातून येथे बांधण्यात आलेले अभ्यासकेंद्र विद्यार्थ्यांना अभ्यासाकरिता खुले करून देण्याऐवजी सभा, संमेलन व अन्य कार्यासाठी वापरण्यात येत होते. यामुळे गावातील युवकांनी अभ्यास केंद्र विद्यार्थ्यांना वाचनालयाकरिता खुले करावे, अशी मागणी केली होती. ग्रा.पं. प्रशासन टाळाटाळ करीत होते. परिणामी, संतप्त युवकांनी अभ्यास केंद्रासमोर एक तास ठिय्या आंदोलन केले. अखेर ग्रा.पं. प्रशासनाने अभ्यास केंद्र खुले करून दिले. ग्रामीण विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून शासनाच्या विविध योजना असल्या तरी ग्रामस्तरावर त्यांची अंमलबजावणी करण्याबाबत उदासीनता आहे. याचा प्रत्यय येथील ग्रा.पं. प्रशासनाच्या कारभारातून आला. दहा हजार लोकसंख्येच्या गावात विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी सुलभ सुविधा उपलब्ध होण्याच्या अनुषंगाने अभ्यास केंद्र उभारण्यात आले; पण ग्रा.पं. ने त्याचा सभा, संमेलने, बैठकांसाठी वापर केला. गावातील काही युवकांनी अभ्यास केंद्र विद्यार्थ्यांना वाचनालय म्हणून खुले करून द्यावे, अशी मागणी केली होती; पण ग्रा.पं. ने कुठलीही उपाययोजना केली नाही. यामुळे युवकांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत अभ्यास केंद्र विद्यार्थ्यांना खुले करून देण्यात यावे, अशी मागणी केली. जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशावरून संबधित विभागाने ग्रा.पं. प्रशासनासोबत पत्र व्यवहार करीत अभ्यास केंद्र खुले करण्याचे निर्देश दिलेत. या निर्देशांचाही उपयोग झाला नाही. परिणामी, युवकांनी थेट अभ्यास केंद्रासमोर तब्बल एक तास ठिय्या आंदोलन केले. दरम्यान, ग्रा.पं. च्या कर्मचाऱ्यांनी आंदोलनासमोर झुकत अभ्यास केंद्र खुले करून दिले. आंदोलनामध्ये शुभम सोरटे, प्रणय खडसे, वैभव कुंभलकर, अजय बावणे, भूपेश गोटे, रितेश मोटघरे, क्षितीज डेकाटे, अतुल डेकाटे, वैभव तुपे, बुध्दघोष थूल, कुणाल सहारे, योगेश मस्कर, शंकर उमाटे आदींनी सहभाग घेतला.