लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : उमेदच्या संकल्प प्रकल्पांतर्गत जिल्हा परिषद शाळा, रोठा येथे दोन वर्षापूर्वी पारधी समाजातील ३० मुलांना दाखल करण्यात आले होते. यावर्षी या मुलांना दाखले देऊन शाळाबाह्य करण्यात आले होते. त्यामुळे त्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्याकरिता प्रकल्पाच्या संचालिका मंगेशी मून यांच्या प्रयत्नाने त्यांना वर्ध्यातील दोन शाळेत प्रवेश देण्यात आला.जिल्हा परिषद शाळा, रोठा येथे पारधी समाजाच्या या विद्यार्थ्यांना वेगळी वागणूक दिली जात असल्याने ते शिक्षणापासून कोसो दूर होते. अशातच या विद्यार्थ्यांना यावर्षी दाखले देऊन शाळाबाह्य करण्यात आले होते. त्यानंतर विद्यार्थ्यांसह प्रकल्प संचालिका मून यांनी जिल्हा परिषदेपुढे आंदोलन करुन मुख्याध्यापक व शिक्षिकेवर कारवाई करण्याची मागणी केली होती. या मुलांचे यावर्षी शैक्षणिक नुकसान टाळण्याकरिता चांगल्या शाळेचा शोध सुरु केला. अखेर मानस मंदिर शाळा आणि वर्धा कन्या शाळेने पुढाकार घेतल्यामुळे या सर्व विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा मार्ग मोकळा झाला. मानस मंदिर शाळेत बालवाडी ते चवथी पर्यंतच्या तर वर्धा कन्या शाळेत पाचवी ते नववीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला आहे.
अखेर ‘त्या’ विद्यार्थ्यांना मिळाला शाळेत प्रवेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2019 9:51 PM
उमेदच्या संकल्प प्रकल्पांतर्गत जिल्हा परिषद शाळा, रोठा येथे दोन वर्षापूर्वी पारधी समाजातील ३० मुलांना दाखल करण्यात आले होते. यावर्षी या मुलांना दाखले देऊन शाळाबाह्य करण्यात आले होते. त्यामुळे त्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्याकरिता प्रकल्पाच्या संचालिका मंगेशी मून यांच्या प्रयत्नाने त्यांना वर्ध्यातील दोन शाळेत प्रवेश देण्यात आला.
ठळक मुद्देवर्ध्यातील दोन शाळांनी घेतला पुढाकार