लोकार्पण थांबले : बांधकाम विभागाची कार्यपद्धती चव्हाट्यावरहरिदास ढोक देवळी यवतमाळकडे जाणाऱ्या महामार्गावरून सहज लक्ष वेधून घेणारी येथील शासकीय विश्रामर्गहाची वास्तू गत एक वर्षापासून लोकार्पणाच्या प्रतीक्षेत आहे. अडीच कोटींच्या खर्चातून ही वास्तू पूर्णत्वास आली. अंतर्गत विद्युतीकरण तसेच पाणी पुरवठ्यासारखी महत्त्वाची कामे सुद्धा पूर्ण झालीत; परंतु या वास्तूसाठी साजेशा व शोभेल अशा फर्निचरच्या खरेदीचा मुर्हूतच निघत नसल्याने, लोकार्पण अडल्याचे दिसून आले आहे. यामुळे बांधकाम विभागाची कार्यपद्धती चव्हाट्यावर आली आहे.औद्योगिक वसाहतीतील कंपन्यांचे जाळे, तालुक्याचे ठिकाण तसेच महामार्गावर धावणाऱ्यांची गरज लक्षात घेवून देवळी येथे सुसज्ज विश्रामगृहाची आवश्यकता विषद करण्यात आली. त्यानुसार सर्व सोपस्कर पूर्ण करून वास्तू बांधकामाला गती देण्यात आली. एक वर्षांच्या कालावधीत ही वास्तू पूर्ण करण्यात आली. यानंतरचे एक वर्ष फक्त फर्निचरची वाट पाहण्यात गेले. या दरम्यानच्या गत दोन वर्षांत जुने विश्रामगृह बंद पडल्याने अधिकाऱ्यांच्या बैठका तसेच महत्त्वपूर्ण व्यक्तींच्या निवास व्यवस्थेला चाप बसला. विश्रामगृह वास्तूचा तळमजला व पहिला मजला अशा पद्धतीने बांधकाम करण्यात आले. अति महत्त्वाच्या (व्ही.व्ही.आय.पी.) व्यक्तींसाठी एक कक्ष, महत्त्वाचे (व्ही.आय.पी.) व्यक्तींसाठी दोन कक्ष तसेच सर्वसाधारण व्यक्तींसाठी दोन कक्ष असे पाच कक्ष उभारण्यात आले. यासोबतच भोजन व मिटींग कक्षाची व्यवस्था करून वास्तूला अद्यावत केले. तळमजला व पहिला मजला यासाठी २२ लाखांच्या फर्निचरचे नियोजन करण्यात आले.
शासकीय विश्रामगृहाकरिता फर्निचर खरेदीचा मुहूर्तच सापडेना!
By admin | Published: September 23, 2016 2:23 AM