लोकमत न्यूज नेटवर्कगिरड : येथील सुप्रसिध्द बाबा फरीद दर्गाह टेकडी परिसरात अचानक आग लागली. या आगीत हजारो रुपयांची वनसंपदा जळून खाक झाली. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न करीत आग आटोक्यात आणली. ही घटना मंगळवारी दुपारी घडली.प्राप्त माहीतीनुसार, आज दुपारी गिरड येथील प्रसिध्द बाबा फरीद दरगाह टेकडी वरील वनविभागाचे ताब्यात असलेल्या परिसराला अचानक आग लागली. या आगीची माहिती मिळताच वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी टेकडी परिसराकडे धाव घेत आगीला आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. तब्बल २ तासाच्या परिश्रमानंतर आग आटोक्यात आली. या आगीने २ हेक्टर परिसरातील वनसंपदा खाक झाली. भर उन्हात ही आग आटोक्यात आणण्याकरिता गिरड वनविभाग कार्यालयाचे सहायक वनपरीक्षेत्र अधिकारी व्ही.जे आडकीने, मंगरूळ वनविभाग कार्यालयाचे सहायक वनपरीश्रेत्र अधिकारी एस.एन. नरगंदे, वनरक्षक खुशाल धारणे, व्ही.एच डोंगे, पी.डी. बेले, विनोद बावणे, वनमजूर राजू दळवेकर, बाबा नागोसे, राजू राऊत, सामाजिक कार्यकर्ता अब्दुल कदिर, नहिम काजी, खल्लिल काजी, श्रभराम सायके, रमेश चौधरी व फरीद बाबा दरगाह टेकडी वरील सर्व कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले.
बाबा फरीद दर्गाह टेकडी परिसरात आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2018 11:43 PM
येथील सुप्रसिध्द बाबा फरीद दर्गाह टेकडी परिसरात अचानक आग लागली. या आगीत हजारो रुपयांची वनसंपदा जळून खाक झाली. वनविभागाच्या कर्मचाºयांनी शर्थीचे प्रयत्न करीत आग आटोक्यात आणली.
ठळक मुद्देगवतासह झाडे आगीच्या भक्ष्यस्थानी : आग आटोक्यात आणताना कर्मचाऱ्यांची दमछाक