शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

चोरट्यांनी लावली गोठ्याला आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2018 11:31 PM

नागपूर-हैद्राबाद राष्ट्रीय महामार्ग क्र.७ वरील येथून आठ किमी अंतरावरील दारोडा येथील शेतकरी मारोतराव लाजुरकर यांच्या शेतीसाहित्याची चोरी केली.

ऑनलाईन लोकमतहिंगणघाट/दारोडा : नागपूर-हैद्राबाद राष्ट्रीय महामार्ग क्र.७ वरील येथून आठ किमी अंतरावरील दारोडा येथील शेतकरी मारोतराव लाजुरकर यांच्या शेतीसाहित्याची चोरी केली. यानंतर गोठ्याला आग लावून पळ काढला. ही घटना बुधवारी रात्री १० ते ११ वाजताच्या सुमारास घडली. चोरीसह आगीत सुमारे १० लाख रुपयांचे नुकसान झाले.दारोडा येथील शेतकरी मारोतराव लाजुरकर यांची राष्ट्रीय महामार्गालगत १५ एकर शेती आहे. त्यात ३० बाय ४० फुट गोठ्याचे बांधकाम केले होते. यात संपूर्ण शेतीसाहित्य ठेवले होते. बुधवारी रात्री १० ते ११ वाजताच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या शेतातील शेतीसाहित्य लंपास केले. शिवाय गोठ्याला आग लावली. चोरट्यांनी गोठ्यातील १६ मिमीचे ८० बंडल ड्रीप पाईप किंमत ५ लाख, स्प्रिंकलरचे १५० पाईप किंमत दीड लाख रुपये, गोठ्यातील नांगर, वखर, फवारणी यंत्र आदी शेतीसाहित्य चोरट्यांनी वाहनात भरून पलायन केले. तत्पूर्वी, त्यांनी गोठ्याला आग लावली. यात ३० बाय ४० फुटाचा अँगल व टिनाचा गोठा जळून खाक झाला. शिवाय १५ ट्रॅक्टर कुटार जळून खाक झाले. आगीमुळे गोठ्यातील तीन गाई गंभीर जखमी झाल्या असून मृत्यूशी झुंज देत आहे. घटनेची माहिती मिळताच लाजुरकर यांनी शेत गाठले. रात्री १२ वाजताच्या सुमारास हिंगणघाट न.प. च्या अग्निशामन विभागात दूरध्वनी केला असता ‘नो रिप्लाय’ येत होता. अखेर त्यांच्या नातलगाने स्वत: जाऊन माहिती दिल्यानंतर अग्निशामन दल घटनास्थळी दाखल झाले; पण तोपर्यंत सर्व साहित्य जळून खाक झाले होते. चोरी गेलेल्या साहित्यासह आगीत १० लाखांचे नुकसान झाले. पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला असून अज्ञात चोरट्यांचा शोध सुरू आहे.

टॅग्स :fireआग