लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा: समुद्रपुरातील इंदिरा नगर येथे दुपारच्या सुमारास अचानक लागलेल्या आगीत ९ घरांची राखरांगोळी होउन लाखो रुपयाचे नुकसान झाल्याने तब्बल ९ परिवार उघड्यावर आले आहेत. दीड तासांच्या अथक परिश्रमाने ही आग आटोक्यात आली.बुधवारी दुपारी ३ च्या सुमारास ही आग लागली. नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत आग विझविण्याचे प्रयत्न केले. हिंगणघाट नगरपरिषदेच्या टँकरने पाण्याचा मारा करण्यात आला. मात्र आगीने उग्ररुप धारण केले. समुद्रपूर पोलीस ठाण्याचे ठाणेदार प्रवीण मुंडे यांनी महाराष्ट्र प्राधीकरणाच्या टँकरला सोबत नेऊन आग विझवण्याचे प्रयत्न सुरु केले. या आगीत जवळच रहात असलेल्या मंदा गजभे यांच्या घरच्या सिलेंडरचा स्फोट झाला आणि त्याने आग अधिकच भडकली. या आगीत नऊ घरांनी पेट घेतला. यात घरातील सर्व साहित्य, अन्नधान्य, कपडलत्ते जळून खाक झाले.तासाभराने अग्निशमन दल विभागाने आगीवर नियंत्रण मिळवले. यावेळी नगरसेवक, अनेक अधिकारी, पोलीस अधिकारी व गावकरी मोठ्या संख्येने मदतीला आले होते. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
वर्धा जिल्ह्यातील समुद्रपुरात आग लागून ९ घरांची राखरांगोळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2018 7:26 PM
समुद्रपुरातील इंदिरा नगर येथे दुपारच्या सुमारास अचानक लागलेल्या आगीत ९ घरांची राखरांगोळी होउन लाखो रुपयाचे नुकसान झाल्याने तब्बल ९ परिवार उघड्यावर आले आहेत.
ठळक मुद्देलाखो रुपयांचे नुकसान