शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Assembly Election Result 2024: एकनाथ शिंदे आज राजीनामा देण्याची शक्यता; पुढील मुख्यमंत्री कोण? चर्चांना उधाण
2
मुख्यमंत्रि‍पदावरून नाराज असल्याची चर्चा; आमदारांबाबत एकनाथ शिंदेंनी उचललं महत्त्वाचं पाऊल
3
चांगल्या कामासाठी मराठी माणसं एकत्र येणं चांगलेच; आमदार महेश सावंत यांचं विधान
4
मुख्यमंत्रि‍पदासाठी शिवसेना नेते आग्रही, पण शिंदेंचा कार्यकर्त्यांना महत्त्वाचा मेसेज; म्हणाले...
5
LIC नं सप्टेंबर तिमाहित केली ३८००० कोटींच्या शेअर्सची विक्री, तुमच्याकडे आहेत का ‘हे’ स्टॉक्स?
6
विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची पिछेहाट, राज्यातील या २३ जिल्ह्यांत फोडता आला नाही भोपळा
7
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक व व्यावसायिकदृष्टया फायदेशीर दिवस
8
वॉरेन बफेट यांनी आपला उत्तराधिकारी ठरवला, दान केले १.१ अरब अमेरिकी डॉलरचे शेअर
9
PAN 2.0 प्रोजेक्ट काय आहे? खर्च होणार १४३५ कोटी रुपये; तुमच्या पॅन कार्डाचं काय होणार? जाणून घ्या
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: भाजप २६.७७% मतांसह राज्यात नंबर वन; मविआत मतांमध्ये कोणता पक्ष ठरला सरस?
11
भारतानं एकाच दिवसात ६४ कोटी मते मोजली; इलॉन मस्क अचंबित, अमेरिकेत अद्यापही मतमोजणी सुरूच
12
Maharashtra Assembly Election Result 2024: देवेंद्र फडणवीस, अमित शाहांची बैठक टळली; एकनाथ शिंदे-अजित पवार आज दिल्लीला जाणार
13
‘खरी शिवसेना कुणाची?’ याचा फैसला शेवटी झालाच! जे कुणाला जमलं नाही ते शिंदेंनी केलं
14
संविधान फक्त ‘नॅरेटिव्ह’पुरते?; संसद सभागृहातील गदारोळ हा अंतर्विरोध क्लेशकारक
15
आंबेडकरी विचारांची धार व धाक कुणी गमावला?; महाराष्ट्राचे, देशाचे राजकारण आता...
16
समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा महिनाभरात खुला; एमएसआरडीसीकडून कामांचा धडाका
17
साडेतीन हजार मालमत्ता होणार जप्त; कर न भरल्याने मुंबई महापालिकेची मोठी कारवाई
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: महायुतीत न जाता भाजपसोबत जाणे ही चूक; राज ठाकरेंसमोर पराभूत उमेदवारांची नाराजी
19
फेअर प्ले आयपीएलप्रकरणी मुंबई, ठाण्यासह  २१९ कोटींची मालमत्ता ईडीने केली जप्त
20
निवडणूक संपताच KDMC तील २ हजार कुटुंबांचे वास्तव्य धोक्यात; सामान्य बुडाले, बिल्डर मोकाट

जिल्ह्यात चार ठिकाणी आग

By admin | Published: April 17, 2017 12:36 AM

जिल्ह्यात रविवारी चार ठिकाणी आग लागली. सेलू तालुक्यात दोन घटना घडल्या.

सेलूत सहा तास वीज बंद : दोन घटनेत पाच गोठे खाक जिल्ह्यात रविवारी चार ठिकाणी आग लागली. सेलू तालुक्यात दोन घटना घडल्या. दोन्ही आगी शेताचे धुरे पेटविल्याने लागण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. सेलू येथील आगीत वीज वितरण कंपनीचे सबस्टेशन आगीच्या भक्ष्यस्थानी येण्यापूर्वी आगीवर ताबा मिळविला तर केळझर येथे सिद्धीविनायक मंदिर परिसरात आग लागल्याने मोठे नुकसान झाले. गिरोली (ंइंगळे) येथे चार तर भिवापूर येथे एक गोठा आगीच्या भक्ष्यस्थानी आला. सेलू : शेतकऱ्याने धुरा पेटविल्याने आगीचे रूप धारण करताच रेहकी मार्गावरील पारेषण कंपनीचे पॉवर स्टेशन आगीच्या विळख्यात आले. येथे यात काम करणाऱ्या दोन रोजंदारी कर्मचाऱ्यांनी वेळीच समयसुचकता दाखवित आगीवर ताबा मिळविला. यामुळे हे दोन्ही सबस्टेशन थोडक्यात बचावले. ही घटना रविवारी दुपारी घडली. या आगीमुळे सहा तास वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता. सेलू परिसराला वीज पुरविणाऱ्या पारेषण कंपनीच्या येथील १३२ व ३३ केव्ही उपकेंद्राजवळील शेतात धुरा जाळला. यावेळी असलेल्या वाऱ्यामुळे आगीने उपकेंद्राला वेढले. आग लागताच सेलू शहराचा व परिसरातील वीजपुरवठा खंडित करण्यात आला. या आगीने उपकेंद्रात कार्यरत कर्मचारी अक्षरशा घाबरुन गेले होते; परंतु त्या उपकेंद्रात कंत्राटी पद्धतीने कामावर असलेले आशुतोष धोटे व जयंत टोंगे या दोन युवकांनी समयसुचकता दाखवून धाडस करीत आगीवर नियंत्रण मिळविले.(तालुका प्रतिनिधी)