लोकमत न्यूज नेटवर्कआगरगाव : पारधी बेड्यावरील शंकेश पंकज चव्हाण यांच्या घराला अचानक आग लागली. यात घरातील कपडे, भांडी, गहू, तांदुळ जळून खाक झाले. यात त्यांचे ४० ते ५० हजार रुपयांचे नुकसान झाले. ही घटना रविवारी पहाटे ३ ते ४ वाजताच्या सुमारास घडली. वेळीच जाग आल्याने पूढील अनर्थ टळला.येथील पारधी बेड्यावर शंकेश पंकज चव्हाण यांचे घर आहे. रात्री जेवण करून सर्वजण झोपी गेले होते. पहाटे घराला आग लागल्याचे लक्षात आल्याने कुटुंबातील सदस्य घराबाहेर पळाले. तोपर्यंत आगीने संपुर्ण घराला कवेत घेतले होते. यामुळे घरातून कोणतीही वस्तू बाहेर काढता आली नाही. आगीमध्ये तांदुळ, गहु, तूर डाळ तसेच इतर धान्य, महत्त्वाची कागदपत्रे जळून खाक झाले. शंकेश यांची परिस्थिती बेताची असल्याने त्यांच्यावर उपासमारीचे संकट ओढवले आहे. संपूर्ण घर जळाल्याने त्यांना दुरुस्ती कशी करावी, याची चिंता आहे.यामुळे शंकेश चव्हाण यांना नैसर्गिक आपत्ती निधीतून मदत करावी, अशी मागणी पारधी बेड्यावरील अचिन पवार, समाजसेवक रवींद्र अंदुरकर यांनी केली आहे. तलाठ्यांनी आगीचा पंचनामा करून अहवाल देवळी तहसील कार्यालयात सादर करावा, अशी मागणीही यावेळी त्यांनी केली.
घराला आग, ५० हजारांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2017 11:20 PM
पारधी बेड्यावरील शंकेश पंकज चव्हाण यांच्या घराला अचानक आग लागली. यात घरातील कपडे, भांडी, गहू, तांदुळ जळून खाक झाले. यात त्यांचे ४० ते ५० हजार रुपयांचे नुकसान झाले. ही घटना रविवारी पहाटे ३ ते ४ वाजताच्या सुमारास घडली.
ठळक मुद्देपारधी बेड्यावरील घटना : वेळीच लक्षात आल्याने अनर्थ टळला