जीवनोपयोगी साहित्याचा कोळसा : सात लाखांचे नुकसानसेलू : येथील धानोली मार्गावरील किशोर आडकु भगत यांच्या राहत्या घराला अचानक आग लागली. या आगीत संपूर्ण घर व त्यातील साहित्याची राख झाली. यात त्यांचे सुमारे सात लाख रुपयांचे नुकसान झाले. ही घटना रविवारी दुपारी घडली. भगत यांचे या परिसरात एकमेव घर आहे. त्यांचा लाकडी फर्नीचर तसेच सागवन व आडजात जळावू लाकूड विकण्याचा व्यवसाय आहे. किशोर भगत यांची दोन विवाहित मुले याच घरात वेगवेगळी राहतात. या आगीत त्यांच्या संसारोपयोगी वस्तु, धान्य व रोख रखमेसह साहित्याचीही राख झाली. यात दोन मोटार सायकलही जळाल्या. शिवाय ५० हजार रुपयांची रोकडही आगीत भस्मसात झाल्याचे सांगण्यात आले आहे. घटनेच्या वेळी किशोर भगत यांचा मुलगा जीवन भगत, पत्नी करिश्मा, साळी रोशनी तसेच तर दुसरा मुलगा मनोहर यांची पत्नी मोनिका, मुलगा नयन (६), मुलगी अक्षरा (७) हे सुद्धा घरीच होते. घराने पेट घेतला असताना सर्वजन सुखरूप घराबाहेर पडले. ते घराबाहेर पडताच घरातील सिलिंडरचा स्फोट झाला. यात घरातील फ्रीज, तीन आलमारी, तीन कुलर, चार दिवाण पलंग, सिलाई मशीन, दोन दुचाकी व जीवनावश्यक वस्तूंची राखरांगोळी झाली. विक्रीसाठी असलेले लाकडी पलंग व कापलेले सागवानही जळून राख झाले. शॉट सर्कीटने आगीची ठिणगी धुऱ्यावर पडून आग घरापर्यंत पेटत आल्याने ही घटना घडल्याचे सांगितले जाते. या घटनेचा पोलिसांनी पंचनामा केला. महसूल विभागाने मदत देण्याची मागणी आहे. विशेष म्हणजे आग लागण्याची सूचना दिल्यानंतरही अग्निशमनचा एकही बंब पोहोचला नाही. विहिरीतील पाण्याचा पाईपद्वारे मारा करून परिसरातील लोकांना आग आटोक्यात आणली. अग्निशामक येण्यापूर्वीच सेलू व धानोलीच्या तरूणांनी आग विणविण्यासाठी परिश्रम घेतले.(तालुका प्रतिनिधी) लाकडाचे ढीग बचावले भगत यांचा लाकडाचा व्यवसाय असल्याने परिसरात लाकडाचे ढिग होते. या आगीत ते ढीग बचावले; मात्र घरातील साहित्याचा कोळसा झाला. या लाकडाच्या ढिगांना काहीच झाले नाही, हे विशेष! दोन दुचाकींसह मालवाहू गाडी जळाली या आगीत घराच्या आवारात ठेवण्यात आलेल्या दोन दुचाकी व एक नादुरूस्त मालवाहू गाडी आगीच्या भक्ष्यस्थानी आली.
धानोली मार्गावरील घराला आग
By admin | Published: April 24, 2017 12:19 AM