लोकमत न्यूज नेटवर्कसमुद्रपूर : जाम येथील पीव्ही. टेक्सटाईल्स आग लागून गोदामातील २५०० च्यावर गाठी जळून खाक झाल्या. यात अंदाजे ६ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.जाम येथे पीव्ही टेक्सटाईल्सचे पीसी युनिटचे गोदाम आहे. चार हजार ७ हजार १९ चौरस फुटात असलेल्या या गोदाममध्ये पॉलीस्टर व कॉटनच्या २५०० च्यावर गाठी आहेत. त्याच गोदाममधून गाठी फोरक्लीट युनिटला क्रेनच्या सहाय्याने पोहचविल्या जात होत्या. दुपारी १.३० वाजता कामगार जेवणाकरिता बसले असता तेथून धूर निघताना दिसताच त्यांनी गोदामात असलेल्या यंत्राच्या सहायाने आग विझविण्याचा प्रयत्न केला, मात्र आग आटोक्यात आली नाही. त्यानंतर नगर परिषद हिंगणघाट, इन्डोरामा बुट्टीबोरा, रिलायन्स बुटीबोरी, पूर्ती बेला येथून आगीचे बंब पाचारण करण्यात आले. जेसीबीच्या सहायाने गोदामातून दोन्ही बाजूच्या भिंती तोडून पाण्याचा मारा सुरू केला तरीही सायंकाळी ६ वाजेपर्यंत आग सुरूच होती. या आगीचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही. घटनास्थळी कंपनीचे उपाध्यक्ष पारसमल मुनोत, व्यवस्थापक भुपेंद्र शहाने, श्याम अलोणी, पी.सी. युनिट इंन्चार्ज इंद्रजीत परिहार, समुपदेशक अर्चना धाकटे व पीव्हीचे कामगार उपस्थित आहे. घटनास्थळी तहसीलदार दीपक करंडे, पोलीस उपनिरीक्षक माधुरी गायकवाड, एएसआय नामदेव चाफले, प्रवीण काळे, मंडळ अधिकारी रवींद्र चकोले तलाठी, विलास राऊत सह मोठ्या प्रमाणात अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
पीव्ही टेक्सटार्ईल्समध्ये आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2017 11:53 PM
जाम येथील पीव्ही. टेक्सटाईल्स आग लागून गोदामातील २५०० च्यावर गाठी जळून खाक झाल्या. यात अंदाजे ६ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
ठळक मुद्देसहा कोटींचे नुकसान : पीसी गोदाम जळून खाक