लोकमत न्यूज नेटवर्कतळेगाव (टा.) : नजीकच्या एकुर्ली येथील शेतशिवारात आग लागली. या आगीत शेतकºयांचे शेतीसाहित्य भस्मसात झाले. ही घटना शनिवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडली. या चार शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले.शेतकरी संगीता महादेव तडस, हरिष पुंडलिक चुटे, निलेश पुंडलिक चुटे व योगेश पुंडलिक चुटे यांचे तळेगाव शिवारात शेत आहे. या शेतात शनिवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास आग लागली. यात ४० स्प्रिंकलर पाईप, पीव्हीसी पाईप, चार एकरातील ड्रीपच्या नळ्या, व्हॉल्व्ह, जनावरांचा चारा पूर्णत: जळाला. यात शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. दुपारी १.३० ते २ वाजताच्या सुमारास शेतात आग लागल्याची माहिती मिळताच शेतकऱ्यांनी शेताकडे धाव घेतली; पण आग संपूर्ण शेतात पसरली होती. दोन दिवसांपासून महावितरणने भारनियमनात बदल केला आहे दिवसभर चालणारा विद्युत पुरवठा रात्री ९ ते सकाळी ६ वाजेपर्यंत बंद असतो. शनिवारी सकाळपासूनच वीज पुरवठा बंद होता. यामुळे शेतकऱ्यांना आग विझविणे शक्य झाले नाही. काही वेळातच आग दोन किलोमीटरपर्यंत गेल्याचे प्रत्यक्षदर्शी सांगतात.यामुळे नाईलाजास्तव जेसीबीच्या साह्याने काही ठिकाणी माती उकरून आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न करण्यात आल. तोपर्यंत आग धोत्रा शिवारापर्यंत पसरली होती. यामुळे अनेक शेतांतील गुरांचा चारा, पाईप, डीप आदी साहित्याची राखरांगोळी झाली. घटनेची माहिती तलाठ्यांना देण्यात आली. यावरून कोतवालांनी घटनास्थळ गाठून पंचनामा करून अहवाल सादर केला.
आगीत शेतीसाहित्य भस्मसात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 01, 2018 11:31 PM
नजीकच्या एकुर्ली येथील शेतशिवारात आग लागली. या आगीत शेतकºयांचे शेतीसाहित्य भस्मसात झाले. ही घटना शनिवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडली. या चार शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले.
ठळक मुद्देतळेगाव येथील घटना : चार शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान