महेश सायखेडे ।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : वन विभागाच्यावतीने सुमारे २४ दिवसीय विशेष मोहीम हाती घेऊन शहरालगतच्या आरामशीनींची तपासणी केली. या मोहिमेदरम्यान सहा ठिकाणी अवैध लाकुडसाठा आढळून आला. तो वनविभागाने जप्त केला आहे. त्याची किंमत ६ लाख २५ हजार रुपये असल्याचे वनविभागाकडून सांगण्यात आले आहे. या कारवाईदरम्यान पाच आरागिरणी मालकांना वनविभागाने वनकायद्यानुसार काम बंद ठेवण्याची नोटीस बजावण्यात आली तर एका आरागिरणीला सिल ठोकण्यात आले आहे.आरा गिरणी चालकांनी लाकडांची कटाई करताना वन विभागाच्या नियमांना अनुसरून आपले काम करावे, असे अपेक्षित आहे; परंतु, अनेक आरा गिरणी मालकांकडून नियमांना फाटा देत लाकूड कटाई केली जात असल्याची माहिती वनविभागाला मिळाली. या माहितीवरून वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी विशेष मोहीम हाती घेवून त्याची प्रभावी अंमलबजावणी केली. या मोहिमेदरम्यान वन विभागाच्या भरारी पथकाने सुमारे सलग २४ दिवस वर्धा शहर व शहराशेजारी असलेल्या आरा गिरणींची चौकशी केली. या पथकाच्या पाहणीदरम्यान काही आरा गिरणीवर अवैध लाकूड साठा असल्याचे दिसून आले. तो वन विभागाच्या अधिकाºयांनी जप्त केला आहे. हा लाकुडसाठा चोरीचा आहे काय याची शहानिशा वन विभागाचे अधिकारी करीत आहेत.सतत २४ दिवस राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेदरम्यान वन विभागाच्या अधिकाºयांनी आरा गिरणीवर गैरप्रकार होत असल्याचे निदर्शनास आल्याने पाच आराममशीन चालकांना काम बंद ठेवण्याची नोटीस बचावली आहे. तर सिंदी (मेघे) भागातील भगवती सॉमिलला सिल ठोकले आहे. ज्या आरा गिरणी चालकांना काम बंद ठेवण्याची नोटीस बजावण्यात आली त्या ठिकाणाहून वन विभागाच्या अधिकारी व कर्मचाºयांनी मोठ्या प्रमाणात आडजात लाकुड जप्त केले आहे. ही कारवाई वरिष्ठ अधिकाºयांच्या मार्गदर्शनात वर्धा वन परिक्षेत्र अधिकारी सागर बन्सोड, क्षेत्र सहाय्यक उमेश शिरपुरकर, वनपाल रवी राऊत, बिट रक्षक भास्कर इंगळे, विजय कांबळे, वनरक्षक वसंत खेळकर, वनपाल विश्वास शिरसाट, वनरक्षक जाकीर शेख, कांडलकर आदींनी केली.१३०.७१९ घन मिटर आडजात लाकुड सापडलेवन विभागाच्या विशेष पथकाने केलेल्या कारवाईत सहाही आरागिरणीत परवाना नसलेले लाकूड दिसून आले. यात एमएयडीसी भागातील श्रीराम सॉमिल येथून ४.३७० घ.मि. आडजात तर आठ भर जलाऊ लाकूड ताब्यात घेतले. याच भागातील प्रताप इंडस्ट्रिज येथून १८.९६६ घ. मि., कारला चौक येथील अंबिका सॉमिल येथून ३५.११५ घ.मि., शास्त्री चौकातील लक्ष्मीविजय सॉमिल येथून १०.२७० घ.मि. व एमआयडीसी भागातील विश्वनाथ इंड्रस्टिज येथून ६१.९९८ घ.मि. आडजात लाकूड ताब्यात घेण्यात आले आहे. सदर लाकडाबाबत आरागिरणी चालकांना विचारणा केली असता त्यांच्याकडे कुठलेही कागदपत्रे आढळून न आल्याने ते जप्त करण्यात आल्याचे सांगण्यात आले. या पाचही आरागिरणी चालकांना तात्पूते काम बंद ठेवण्याची नोटीस बजावण्यात आली आहे.श्रीराम सॉमिलवर वनगुन्हावनविभागाच्या अधिकाºयांच्या पाहणीदरम्यान या आरागिरणीत अनेक त्रुटी आढळल्याने तसेच कुठलाही परवाना न बाळगता मोठ्या प्रमाणात आडजात तथा जलाऊ लाकडाचा साठा केल्याचे निदर्शनास आल्याने श्रीराम सॉमिलच्या मालकाविरुद्ध वनगुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाची चौकशी वनविभागाच्या अधिकाºयांकडून करण्यात येत आहे.प्रताप इंडस्ट्रीजचा आरा केला बंदकाम बंद ठेवण्याच्या सूचना देऊनही काम सुरू करण्यात आल्याचे वन विभागाच्या अधिकाºयांच्या पाहणीत आढळून आले. तसेच अनेक गैरप्रकार या आरागिरणीत होत असल्याचे वन विभागाच्या प्राथमिक चौकशीत लक्षात येताच सदर आरागिरणीच्या मालकाविरुद्ध वन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवाय एका आरा यंत्राला सिल ठोकण्यात आले आहे.
पाच आरा गिरण्यांना नोटीस तर एकाला सील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2018 9:53 PM
वन विभागाच्यावतीने सुमारे २४ दिवसीय विशेष मोहीम हाती घेऊन शहरालगतच्या आरामशीनींची तपासणी केली. या मोहिमेदरम्यान सहा ठिकाणी अवैध लाकुडसाठा आढळून आला. तो वनविभागाने जप्त केला आहे.
ठळक मुद्दे६.२५ लाखांचा मुद्देमाल जप्त : सर्वत्र आढळला आडजातचा अवैध लाकुडसाठा