लोकमत न्यूज नेटवर्कदेवळी : यवतमाळ मार्गावरील रत्नापूर शिवारात कापसे स्टोन क्रेशरजवळ एका कारला अज्ञात वाहनाने धडक दिली. यामध्ये कारमधील पाच जण गंभीर जखमी झाले. जखमींना उपचाराकरिता सावंगी रुग्णालयात हलविण्यात आले. ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात मंगळवारी पहाटे ५.३० वाजताच्या सुमारास ही घटना घडली.पोलीस सुत्रानुसार, एमएच ३१ सीआर ०१२४ या क्रमांकाच्या कारने तुमसर येथील काही युवक यवतमाळ येथे एका कार्यक्रमात आले होते. परतीच्या प्रवासात तुमसरकडे जात असताना त्यांची गाडी देवळी तालुक्यातील रत्नापूर शिवारात अपघातग्रस्त झाली. यामध्ये कारमधील चालक भुपेंद्र गोपीचंद कुकडे, प्रफुल जीतेंद्र बडवाईक, लता दसाराम बडवाईक, बबीता दसाराम बडवाईक व राधिका गोसावी देशमुख गंभीर जखमी झाले.दोन पैकी एका वाहनाने ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात धडक दिल्याचे सांगितले जात आहे. अज्ञात वाहनाचा देवळी पोलीस शोध घेत आहे.हा अपघात पहाटेच्या दरम्यान झाल्यामुळे नागरिकांनी गाडीतील जखमींना रुग्णालयात दाखल केले. सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रमेश मिश्रा यांनी घटना स्थळाला भेट दिली असून तपास सुरू आहे.
कार अपघातात पाच गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2018 10:26 PM
यवतमाळ मार्गावरील रत्नापूर शिवारात कापसे स्टोन क्रेशरजवळ एका कारला अज्ञात वाहनाने धडक दिली. यामध्ये कारमधील पाच जण गंभीर जखमी झाले. जखमींना उपचाराकरिता सावंगी रुग्णालयात हलविण्यात आले. ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात मंगळवारी पहाटे ५.३० वाजताच्या सुमारास ही घटना घडली.
ठळक मुद्देरत्नापूर शिवारातील घटना : जखमींवर उपचार सुरू