लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : सैनिक परिवाराच्या सहाय्यासाठी कायम प्रशासन आणि नागरिक तत्पर असले तर सैनिक देशाच्या रक्षणासाठी निश्चितपणे कर्तव्य बजावू शकतो. ही जाणीव ठेवून प्रशासन सैनिकांच्या कुटुंबियांच्या अडचणीत सहाय्य करण्यासाठी कायम तत्पर असेल. कुटुंबीयांच्या सर्व छोट्या मोठ्या समस्या सोडवण्याचा १०० टक्के प्रयत्न करण्याची हमी अप्पर जिल्हाधिकारी संजय दैने यांनी दिली.ध्वजदिन निधी संकलनाचा शुभारंभ कार्यक्रम मंगळवारी विकास भवन येथे पार पडला. यावेळी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी प्रभारी जिल्हा पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे, शिक्षणाधिकारी सिद्धार्थ मेश्राम, जिल्हा माहिती अधिकारी मनीषा सावळे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ प्रज्ञा डायगव्हाणे, यवतमाळचे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी फ्ला. ले. धनंजय सदाफळ, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी डॉ शिल्पा खरपकर, माजी सैनिक कल्याण अधिकारी कर्नल चित्तरंजन चावरे, डॉ सचिन पावडे आदी मान्यवर उपस्थित होते. ध्वजदिन निधी संकलन करताना उद्दिष्ट शंभर टक्के पूर्ण होण्यासाठी त्याचा वेळोवेळी आढावा घ्यायला हवा. अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्यामुळे त्या जागी आलेल्या नवीन अधिकाºयांना उद्दिष्टाची कल्पना नसते. त्यामुळे वर्षातून दोन- तीनदा याबाबीचा आढावा घेतल्यास उद्दिष्ट लवकर पूर्ण होण्यास मदत होईल असे दैने यांनी यावेळी सांगितले. यावेळी बोलताना निखिल पिंगळे म्हणाले, सैनिक जाती-पातीच्या पठडीबाहेर जाऊन देशाच्या संरक्षणासाठी लढत असतात. स्वातंत्र्य लढ्यानंतरही आपला लढा सुरूच आहे. देशाचे स्वातंत्र्य अबाधित राखण्याचे काम आपले सैनिक सीमेवर परकीय शत्रूशी लढून पार पाडतात, तर देशांतर्गत कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस आपले कर्तव्य बजावत असतात. सीमेवर थेट बंदुकीची गोळी चालवण्याचे अधिकार सैनिकांना आहेत. मात्र येथे गोळी न चालवता शांतता कायम राखण्याचे काम पोलिसांना पार पडावे लागते. स्वराज्याची निर्मिती करणारे शिवाजी महाराज दुसºयांच्या घरी जन्माला यावे असे प्रत्येकाला वाटत असते. पण देशाच्या संरक्षणासाठी शहिद होणाºया सैनिकांच्या माता पित्यानी प्रत्यक्ष शिवाजीला आणि राणी लक्ष्मीबाईला जन्म दिला आहे. त्यामुळे वीर माता आणि पित्याचे योगदान खूप मोठे आहे असे सांगून त्यांच्या सोबत असलेल नातं आणखी दृढ होण्यासाठी जे जे काही करता येईल ते सर्व करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे पिंगळे यांनी यावेळी सांगितले. यावेळी प्रज्ञा डायगव्हाणे, धनंजय सदाफळ, डॉ सचिन पावडे, माजी कर्नल चित्तरंजन चावरे, सिद्धार्थ मेश्राम यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी डॉ शिल्पा खरपकर यांनी प्रास्ताविक केले.यावेळी वीर माता आणि पत्नींचा शाल श्रीफळ आणि साडी-चोळी देऊन सत्कार करण्यात आला. तसेच १२ वी मध्ये ९१ टक्के गुण मिळवणाºया तनिशा गौरखेडे या विद्यार्थिनींचा शाल,श्रीफळ आणि धनादेश देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी मान्यवरांना ध्वज लावून निधी संकलनाचा शुभारंभ करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन बालाजी शेंडगे यांनी केले तर आभार यशवंत देशमुख यांनी मानले. कार्यक्रमाला माजी सैनिक, शहिद सैनिकांच्या वीर माता आणि वीर पत्नी उपस्थित होत्या.ध्वज निधी संकलनात जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालय, सामाजिक संघटना यांनी सहकार्य करावे असे आवाहन शासनाच्यावतीने करण्यात आले.
ध्वजदिन निधी संकलन शुभारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2018 10:43 PM
सैनिक परिवाराच्या सहाय्यासाठी कायम प्रशासन आणि नागरिक तत्पर असले तर सैनिक देशाच्या रक्षणासाठी निश्चितपणे कर्तव्य बजावू शकतो. ही जाणीव ठेवून प्रशासन सैनिकांच्या कुटुंबियांच्या अडचणीत सहाय्य करण्यासाठी कायम तत्पर असेल.
ठळक मुद्देसंजय दैने : प्रशासन कायम सैनिकांच्या कुटुंबीयांसोबत