लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : स्थानिक बस स्थानक येथून रविवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास निघालेला आॅटो चालक व मालकांचा मोर्चा इंगोले चौक, ठाकरे मार्केट चौक, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौक, इंदिरा गांधी पुतळा चौक होत दुपारी १ वाजताच्या सुमारास डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात दाखल झाला. या मोर्चाच्या माध्यमातून आॅटो चालक व मालकांकडून पुलवामा येथील भ्याड हल्ल्याचा निषेध नोंदविण्यात आला. सदर मोर्चा डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात पोहोचला असता तेथे शहिदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.पाकिस्तान दहशतवाद्यांना मदत करीत असल्याने त्याच्या विरोधात भारत सरकारने कठोर भूमिका घेत झटपट ठोस निर्णय घ्यावा, अशी मागणी यावेळी आंदोलनकर्त्या आॅटोचालक व मालकांनी रेटली. अमर रहे... अमर रहे.. शहीद जवान... अमर रहे... अशा शहिदांच्या स्मरनार्थ घोषणा देत पाकिस्तान मुर्दाबादचे नारेही लाऊन आंदोलनकर्त्यांनी आपला रोष व्यक्त केला. स्थानिक बस स्थानक येथून निघालेल्या या मोर्चाने, निर्मल बेकरी चौक, सोशालिस्ट चौक, इंगोले चौक, ठाकरे मार्केट चौक, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौक, इंदिरा गांधी पुतळा चौक, स्व. बापूरावजी देशमुख पुतळा चौक होत डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर गाठला. सदर आंदोलनादरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला होता. मोर्चात आॅटो युनियनचे जिल्हाध्यक्ष देवा निखाडे, सुनील राऊत, शेरु कंजर, संजय कवाडे, ईमरान शेख, रवी उपाध्ये, रहीम शेख, प्रदीप नगराळे, भावेश ढाले, गॉडवीन जॉन, फिरोज शेख, गोवर्धन खंडाळकर, शिसम गायकवाड, जमीलभाई, राजू चव्हाण, शकील शेख व आदी सहभागी झाले होते.
पुलवामा हल्ल्याची धग अजूनही कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2019 12:28 AM
स्थानिक बस स्थानक येथून रविवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास निघालेला आॅटो चालक व मालकांचा मोर्चा इंगोले चौक, ठाकरे मार्केट चौक, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौक, इंदिरा गांधी पुतळा चौक होत दुपारी १ वाजताच्या सुमारास डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात दाखल झाला.
ठळक मुद्देआॅटो चालक व मालकांचा मोर्चा : घटनेचा निषेध नोंदवून शहिदांना केले अभिवादन