शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
2
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
3
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
4
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
5
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
6
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
7
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
8
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
9
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
10
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
11
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
12
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
13
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
14
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
15
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
16
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
17
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
18
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
19
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान

वाई पुलावरून पुराचे पाणी; रहदारी ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2019 11:27 PM

नजीकच्या वाई येथील नाल्यावरून असलेल्या मोडक्या पुलावरून पाणी वाहत असल्याने रोहण्यावरून वाई-पिंपळधरी येथे व वाई-पिंपळधरीवरून बाहेरगावी जाणारे प्रवासी विद्यार्थी, शेतकरी व शेतमजुरांची रहदारी ठप्प आहे.

ठळक मुद्देदुरूस्तीकडे शासनाचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्करोहणा : नजीकच्या वाई येथील नाल्यावरून असलेल्या मोडक्या पुलावरून पाणी वाहत असल्याने रोहण्यावरून वाई-पिंपळधरी येथे व वाई-पिंपळधरीवरून बाहेरगावी जाणारे प्रवासी विद्यार्थी, शेतकरी व शेतमजुरांची रहदारी ठप्प आहे. पूल मागील पाच वर्षांपासून मोडकळीस आला असून दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहे. बांधकाम विभागाने गावकऱ्यांच्या या मागणीकडे कायम दुर्लक्ष केल्याने वाई-पिंपळधरी येथील जनजीवन ठप्प झाले आहे.वाई-पिंपळधरी ही दोन्ही गावे आदिवासीबहुल असून गावातून बाहेर वळताना गावाला वळसा घेत वाहणाºया नाल्यावरील पुलावरून येण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. या नाल्यावरील पूल खोल असून पुलावर मोठ-मोठे खड्डे आहेत. सलाखी उभ्या पडल्या आहेत. थोड्या पावसाने सदर पुलावरून पाणी वाहते, पूल दुरुस्त व्हावा, तो उंच करून दोन्ही बाजूला कठडे बसवा, अशी मागणी मागील पाच वर्षांपासून ग्रामस्थ करीत आहेत. चार वर्षांपूर्वी वसंत पुनवटकर पूल ओलांडताना वाहून गेला. दोन गावातील विद्यार्थी पुलावरून जीव मुठीत घेऊनच ये-जा करताना करतात. दोन वर्षांपासून मोठा पाऊस न झाल्याने समस्येची तीव्रता जाणवली नाही; आता सुरू असलेल्या संततधार पावसाने पूल पाण्याखाली आला. परिणामी, रोहण्यातील ज्यांची शेती वाई-पिंपळधरी शिवारात आहे, ते शेतात जाऊ शकत नाही, तर वाई-पिंपळधरी येथील विद्यार्थी शाळेत जाऊ शकले नाही.गावातील नागरिक, आवश्यक गरजा भागविण्यासाठी गावाबाहेर जाऊ शकले नाहीत. पूल दुरुस्तीला आणखी एखाद्या नागरिक वाहून जाण्याची प्रतीक्षा आहे की काय, अशी नाराजीची प्रतिक्रिया माजी सरपंच गणेश गजकेश्वर यांनी व्यक्त केली.

टॅग्स :Rainपाऊसfloodपूर