शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
2
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
3
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
4
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा
5
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
6
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
7
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…
8
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
9
मणिपूरमध्ये वाद वाढला, एनडीएचा प्रस्ताव मैतेई संघटनेने फेटाळला; २४ तासांचा अल्टिमेटम दिला
10
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
11
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
12
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
13
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
14
शेत, प्लॉट मोजणीचे शुल्क किती, माहितेय का?
15
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
16
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
17
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
18
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
19
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
20
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा

वनकर्मचाऱ्यांकडून चारा पिकाची सवंगणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 03, 2018 12:10 AM

खरांगणा तथा हिंगणी वनपरिक्षेत्रांतर्गत वाघाने शेतकरी, शेतमजूरच नव्हे तर वन विभागालाही त्रस्त केले आहे. वाघांनी कड्याळूच्या शेतात बस्तान मांडल्याचे सांगितले जात आहे. यामुळे शेतकरी धास्तावले आहेत. परिणामी, गुरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देवाघाच्या दहशतीचा परिणाम : वनाधिकाऱ्यांची दमछाक

लोकमत न्यूज नेटवर्कआकोली : खरांगणा तथा हिंगणी वनपरिक्षेत्रांतर्गत वाघाने शेतकरी, शेतमजूरच नव्हे तर वन विभागालाही त्रस्त केले आहे. वाघांनी कड्याळूच्या शेतात बस्तान मांडल्याचे सांगितले जात आहे. यामुळे शेतकरी धास्तावले आहेत. परिणामी, गुरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. यावर पर्याय म्हणून वनपरिक्षेत्र अधिकारी स्वत: हजर राहून वनमजुरांकडून शेतकऱ्यांच्या शेतातील कड्याळू कापून घेत आहेत.खरांगणा व हिंगणी वन परिक्षेत्रांतर्गत सुसूंद, सुसंंूद (हेटी), बोरगाव (गोंडी), माळेगाव (ठेका), रायपूर, आमगाव आदी गावांत वाघाने धुमाकूळ घातला आहे. सुसंूद, बोरगाव (गोंडी) भागात तर पाळीव प्राण्यांच्या शिकारीचा सपाटाच लावला. याच काळात आमगावातील चेतन खोब्रागडे या युवकाचा बळी गेला. दररोज वेगवेगळ्या भागात वाघाचे दर्शन होत आहे. उन्हाळ्यात शेतकऱ्यांनी शेतात पेरलेल्या कड्याळूचा भाग वाघाने आश्रयस्थान बनविल्याने चारापीक काढता आले नाही. आता खरीपाचा हंगाम तोंडावर आला आहे. अशा वेळी चारापीक काढून शेतीची मशागत करावी लागणार आहे; पण चारापीक सवंगणी करायला कसे जायचे, हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला होता. यावर वनविभाग मदतीला धावून आला. वनविभागाचे अधिकारी स्वत: हजर राहून वनरक्षक व वनमजुराला सोबतीला आणत चारा पिकाची सवंगणी करीत आहेत.वाघाने वनमजुरांना बनविले शेतमजूरशेतकरी, शेतमजुरांमध्ये वाघाने धडकी भरविली आहे. परिणामी, यंदा खरीपाची पेरणी, जागली कशी करावी, ही चिंता त्यांना त्रस्त करीत आहे. मदनी, बोरखेडी, आमगाव (म.) भागापर्यंत वाघाने मजल मारली आहे. शिवाय खरांगणा वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या बोरखेडी गावात सलग तीन दिवसांपासून बिबटही आपल्या पिल्लांसह गावात येत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीती तथा संतापही दिसून येत आहे.शेतकºयाने तशी भीती व्यक्त केली तर स्वत: हजर राहून वनरक्षक व वनमजुरांना मदतीला देऊन कड्याळूची कापणी करतो. काल-परवा मेघराज पेठे नामक शेतकऱ्याने कड्याळू पिकात वाघ असल्याचे सांगितले. स्वत: गेलो व वनकर्मचाऱ्यांना सवंगणी करायला लावली. शेतकरी दहशतीत आहे, हे खरे आहे. यात आमचीही दमछाक होत आहे.- ए. एस. ताल्हण, वनपरिक्षेत्र अधिकारी, हिंगणी.

टॅग्स :Tigerवाघ