अरविंद काकडे।लोकमत न्यूज नेटवर्कआकोली : व्याघ्र प्रकल्पाच्या कार्यक्षेत्रात जनावरे चराईवर बंदी असताना सध्या न्यू बोर व्याघ्र प्रकल्पाच्या आवारात मनमर्जीने जनावरांना चरण्यासाठी सोडले जात असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. व्याघ्र प्रकल्पातील काहींच्या आर्शीवादानेच चारा विक्रीचा हा गोरखधंदा सुरू असल्याची चर्चा परिसरात असून यामुळे अधिकाऱ्यांच्या कार्यप्रणालीवरच काही सुजान नागरिकांकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.व्याघ्र प्रकल्पात परवानगी शिवाय प्रवेश करणाºयांवर दंडात्मक कारवाई केली जाते. मात्र सध्या न्यू बोर व्याघ्र प्रकल्प परिसरात मनमर्जीने गुरे चरण्यासाठी सोडली जात असल्याने नियमांनाच फाटा मिळत आहे. न्यु बोर व्याघ्र प्रकल्प परिसराचा फेरफटका मारल्यावर कुंपणच शेत खात असल्याचा प्रत्यय येतो. आमगाव (जं) गावाला लागून असलेल्या न्यू बोर व्याघ्र प्रकल्पात सकाळी व सायंकाळी गुरे चरण्यासाठी सोडली जातात. वनरक्षकही त्याकडे दुर्लक्ष करण्यातच धन्यता मानत असल्याने त्याच्या कार्यप्रणालीवर प्रश्न उपस्थित केले जात आहे.हिंसक वन्य प्राण्यांसाठी असलेल्या संरक्षित वनात गुरे चारण्याचा सोडणे म्हणजे त्यांच्या तोंडीच ही पाळीव जनावरे देण्यासारखे असल्याचे भानही वनरक्षक विसल्याचे दिसून येत आहे. आमगाव (जं), मरकसूर, माळेगांव (ठेका) भागातील जनावरे मोठी रक्कम घेऊनच गुरे चारण्यासाठी प्रतिबंधित क्षेत्रात सोडली जात असल्याची खात्रिदायक माहिती सुत्रांनी नाव न प्रकाशित करण्याच्या अटीवर दिली.अवैध वृक्ष कत्तल जोमातसंरक्षित वनातून सागाची मोठाली वृक्ष अवैध पद्धतीने तोडली जात आहेत. असे असताना एका प्रकरणात माळेगावच्या एकाला पकडण्यात आले होते. परंतु, त्याच्याकडून १ हजार २०० रुपये घेवून त्यास सोडण्यात आल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे वेळी योग्य पाऊल उचलण्याची गरज आहे.
न्यू बोर प्रकल्पात चारा विक्रीचा गोरखधंदा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2018 11:45 PM
व्याघ्र प्रकल्पाच्या कार्यक्षेत्रात जनावरे चराईवर बंदी असताना सध्या न्यू बोर व्याघ्र प्रकल्पाच्या आवारात मनमर्जीने जनावरांना चरण्यासाठी सोडले जात असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे.
ठळक मुद्देअधिकाऱ्यांची मूकसंमती : सरंक्षित वनात चरतात पाळीव जनावरे