चार ठिकणी कारवाई : १२ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त वर्धा : जिल्ह्यात सुरू असलेले नवरात्र व विधानसभेच्या काळात शांतता रहावी याकरिता जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या निर्देशाने दारूबंदी मोहीम राबविण्यात येत आहे. यात पुलगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असलेल्या आगरगाव येथील पारधी बेड्यावर धाड घालून गावठी दारूभट्ट्या नष्ट केल्या. यात ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यात दोघांना अटक करण्यात आली. ही कारवाई शनिवारी रात्री करण्यात आली. अटक करण्यात आलेल्यात जशानी नुरनल चव्हाण (५४), बालामती नगीनदास पवार (४५) यांचा समावेश असल्याचे पुलगाव पोलिसांनी सांगितले आहे. पुलगाव हद्दीतील आगरगाव पारधी बेड्यावर पोलिसांनी छापा मारून मोहा दारू गाळण्याकरिता तयार असलेला मोहा रसायन सडवा नष्ट केला. यात जशानी चव्हाण, बालामती पवार दोन्ही रा. आगरगाव पारधी बेडा यांना दारू गाळतांना पकडले. या दोघांविरूद्ध पुलगाव पोलिसात दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ही कारवाई एसडीपीओ राजन पाली, ठाणेदार राजेंद्र तायडे, उपनिरीक्षक आर.के. हाके, एल.जी. खेडेकर, जे. एस. शेख, जमादार प्रकाश लसुंते, दिनेश कांबळे, राठोड, किशोर साखरे, किशोर लभाणे, नितीन मेश्राम, भारत पिसुड्डे, गुड्डू भुत, प्रशांत बावनक व मिना मार्इंदे यांनी केली.या व्यतिरिक्त भिडी येथे स्थानिक गुन्हे शाखा व देवळी पोलिसांनी नाकाबंदी दरम्यान केलेल्या कारवाईत दारूची अवैध वाहतूक करताना दोघांना अटक करण्यात आली. मुकेश उर्फ खन्ना जयस्वाल, सुरज नेहारे दोघेही रा. कळंब अशी आरोपीची नावे आहे. एम.एच.२९-१८६८ ने देशी दारूचा साठा घेवून जात होते. या कारवाईत वाहनासह १ लाख ९५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.(प्रतिनिधी)
आगरगाव पारधी बेड्यावर धाड
By admin | Published: September 29, 2014 12:48 AM