जलयुक्त शिवारची कामे शंभर टक्के पूर्ण : तहसीलदार व अधिकाऱ्यांकडून पाहणीलोकमत न्यूज नेटवर्कआष्टी (शहीद) : दुष्काळावर मात करण्यासाठी राज्य शासनाने जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत कामे सुरू केली. यामध्ये आष्टी वनविभागाला दिलेले उद्दिष्ट कालावधी संपन्यापूर्वीच पूर्ण केल्यामुळे अव्वल स्थान प्राप्त झाले आहे. या सर्व कामांची पाहणी तहसीलदार सीमा गजभिये यांच्यासह अधिकाऱ्यांनी केली असून समाधान व्यक्त केले आहे. शासनाच्या उद्देशाचा गावपातळीवर लाभ होण्याचा मानस व्यक्त केला आहे.वन्य प्राणी असलेल्या या भागात वन्यप्राण्यांना पिण्याचे पाणी मिळावे म्हणून जंगलात पाणवठे तयार करण्यात आले होते. त्यामुळे काहीसा दिलास मिळाला होता. यावर कायमस्वरूपी मात करण्यासाठी वनपरिक्षेत्र अधिकारी अमोल चौधरी यांनी जंगलात जलयुक्त शिवार अभियाने राबविण्याचा निर्णय घेतला. तसा प्रस्ताव तहसीलदार, जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविला. वर्धा वनिवभागाचे उपवनसंरक्षक डी. डब्ल्यू पगार यांनीही सहकार्य केले. या कालावधीपूर्वीच सर्व कामे तातडीने पूर्ण करून चौधरी यांनी आदर्शन घालून दिला आहे. त्यांनी पिलापूर रोपवाटिकामध्ये दोन लाख रोपटे तयार केले. शासनाचा निधी मनरेगा योजनेतून वापरून सर्व मजुरांना काम मिळवून दिले. जलयुक्त शिवार अभियानात कामांची पाहणी करून अधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. यावर्षी आष्टी तालुक्यात पाणी साठवणमध्ये मोठा फायदा होणार आहे. अशाच प्रकारची कामे इतर विभागाने करून दाखविण्याची गरज व्यक्त होत आहे. या कामामुळे वनविभागाच्या कामाची सर्वत्र चर्चा होत आहे. सर्व कामे कमी वेळात पूर्ण करून वनपरिक्षेत्र अधिकारी चौधरी यांनी आदर्श घालून दिला. यावर वनविभाग पूर्णपणे समाधानी आहे. इतरही वनपरिक्षेत्रात अशाच धर्तीवर नियोजनाच्या सूचना दिल्या आहेत.-डी.डब्ल्यू. पगार, उपवनसंरक्षक वनविभाग, वर्धा
आष्टी तालुक्यात वनविभाग अव्वलस्थानावर
By admin | Published: May 09, 2017 1:04 AM