शिवाजी चौकातून वळणाऱ्या वाहनांची गोचींशास्त्री व आरती चौकात नियम पाळणे कठीणलोकमत संडे स्पेशलवर्धा : शहरातील शिवाजी चौक, इंदिरा गांधी चौक (पूर्वीचा आरती चौक) व शास्त्री चौकातील वाहतूक नियंत्रित करण्याकरिता चांगलेच दिव्य करावे लागते. या चौकातून जात असलेल्या वळण रस्त्यांना कुठलीही आडकाठी नसल्याने येथे अपघाताची शक्यता आहे. यावर मार्ग काढण्याची मागणी शहरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे. शहरातील मुख्य मार्ग दोन मार्गात रूपांतर करीत करणारा चौक म्हणून शिवाजी चौकाची ओळख निर्माण झाली आहे. या चौकातून एक मार्ग आर्वीकडे जातो दुसरा मार्ग नागपूर जिल्ह्याकडे जात आहे. दोन्ही मार्गाने जाताना कुठलीही अडचण होत नाही तर नागपूरकडून येणाऱ्या मार्गावरून आर्वी मार्गावर वळताना व आर्वी मार्गावरून नागपूर मार्गाकडे वळताना वाहन चालकांना मोठी अडचण निर्माण होत आहे. यावर मार्ग म्हणून पुतळ्याच्या मागच्या बाजूने एक रस्ता तयार करण्यात आला आहे; मात्र या रस्त्यालगत असलेल्या घरामुळे समोरून येणारे वाहन दिसत नसल्याने येथे अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. अशीच अवस्था शास्त्री चौक परिसरात आहे. या चौकातून रेल्वे स्थानक, बस स्थानक व आर्वी नाक्याकडे जाणारा मार्ग असल्याने वर्दळ असते. या चौकात वाहतुकीला नियंत्रित करण्याकरिता व नियम दर्शविण्याकरिता कुठलीही सोय नसल्याने छोटे-मोठे अपघात झाले आहेत. इंदिरा गांधी चौकाची अवस्था यापेक्षा वेगळी नाही. पुतळा लावून आज २० वर्षांचा कालावधी झाला तरी हा चौक आपले नाव निर्माण करण्यास असर्थ ठरत आहे. हा चौक सध्या मोठ्या वाहनांकरिता ‘पार्किग झोन’ झाला आहे. यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. याकडे लक्ष देत पालिका प्रशासनाने उपाययोजना आखण्याची गरज निर्माण झाली आहे.
चौकांच्या निर्मितीत रचनेचा विसर
By admin | Published: July 19, 2015 2:06 AM