लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : वायफड परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे रस्ता पूर्णत: वाहून गेला. परिणामी, शेतकऱ्यांची वहिवाट ठप्प झाली असून परिसरातील दहावर गावांचा संपर्क तुटला. अनेक शेतांमध्ये पाणी शिरल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.गुरुवारी वायफड परिसराला तब्बल चार तास मुसळधार पावसाने झोडपून काढले. या पावसामुळे नदी-नाले ओसंडून वाहू लागले. नाल्यांना पूर आला. दरम्यान वायफड ते लोणसावळी मार्गावरील घोडमारे व चरडे यांच्या शेताजवळ पुलाशेजारी सिमेंट पायल्या टाकून रस्ता तयार करण्यात आला होता. मुसळधार पावसामुळे नाल्याला पूर आल्याने रस्ता पूर्णत: वाहून गेला. सध्या खरीप हंगाम सुरू आहे. बहुतांश शेतकऱ्यांची पेरणी कामे आटोपली असून सोयाबीन, तूर, कपाशी आदी पिके बहरली आहेत. अनेक ठिकाणी निंदण आणि डवरणीही सुरू आहे. पावसामुळे रस्ताच वाहून गेल्याने वायफड ते लोणसावळी शिवारातील शंभरावर शेतकऱ्यांच्या शेतीकामात ऐन हंगामात अडथळा निर्माण झाला आहे. वायफड शिवारात शेती असलेल्या शेतकऱ्यांना डोरली, लोणसावळी असा १० किलोमीटरचा फेरी घेऊन शेतीकामे करावी लागत आहेत. यात शेतीसाहित्य नेताना तारेवरचीकसरत करावी लागत आहे. रस्त्याअभावी वायफड, लोणसावळी, शेकापूर, आंजी, मांडवा आदी गावांतील शेतकरी नागरिकांच्या आवागमनाचा प्रश्न निर्माण झाला असून संपर्क तुटला आहे. शासकीय यंत्रणेने रस्ता आणि पुलाचे बांधकाम करावे, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.रस्त्याची मागणी धूळखातया रस्त्यासह पुलाचे बांधकाम करण्याबाबत मार्च महिन्यातच शेतकऱ्यांनी संबंधित विभागाकडे मागणी केली होती. तसा प्रस्तावही तयार करून प्रशासनाकडे सादर करण्यात आला होता. मात्र, याकडे शासकीय यंत्रणेकडून कानाडोळाच करण्यात आला. शासकीय दिरंगाईचा ऐन हंगामात रस्त्याअभावी शेतीकामांना फटका बसला आहे.शेतपिकांचे होतेय नुकसानवायफड-लोणसावळी मार्गाचे सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत डांबरीकरण करण्यात आले. मात्र, बांधकामावेळी रस्त्याच्या दुतर्फा नाल्यांचे बांधकाम करण्यात आले नाही. यामुळे पावसाचे पाणी वाहून जाण्यास मार्गच नसून पाणी थेट शेतात शिरत पिकांचे नुकसान होते, अशी माहिती शशांक घोडमारे यांनी दिली.
वायफड परिसरात चार तास कोसळधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2020 5:00 AM
गुरुवारी वायफड परिसराला तब्बल चार तास मुसळधार पावसाने झोडपून काढले. या पावसामुळे नदी-नाले ओसंडून वाहू लागले. नाल्यांना पूर आला. दरम्यान वायफड ते लोणसावळी मार्गावरील घोडमारे व चरडे यांच्या शेताजवळ पुलाशेजारी सिमेंट पायल्या टाकून रस्ता तयार करण्यात आला होता. मुसळधार पावसामुळे नाल्याला पूर आल्याने रस्ता पूर्णत: वाहून गेला.
ठळक मुद्देरस्ता गेला वाहून : परिसरातील दहा गावांचा संपर्क तुटला