शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मविआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

बँकॉकमध्ये अडकलेले महाराष्ट्रातील चार विद्यार्थी स्वगृही परतले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 08, 2020 4:51 PM

शासनाने ‘वंदे भारत मोहिमेत’ थायलंडचा समावेश करून तेथे अडकलेल्या महाराष्ट्रातील चार विद्यार्थ्यांना स्वगृही पोहोचविले. त्यामुळे या विद्यार्थ्यांनी लोकमतचे आभार मानले आहे.

ठळक मुद्देवर्ध्यातील एकाचा समावेशमहाराष्ट्र मंडळाने दिला आधारविद्यार्थ्यांनी मानले लोकमतचे आभार

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : नागपूर येथील एका महाविद्यालयात शिक्षण घेणारे विविध राज्यांतील १३ विद्यार्थी थायलंडमध्ये प्रशिक्षणाकरिता गेले असता लॉकडाऊनमुळे अडकून पडले होते. दरम्यान, शासनाने परदेशातील विद्यार्थ्यांना परत आणण्याकरिता ‘फ्लाईट प्लॅन’ तयार केला होता. पण, यात थायलंडचा समावेश नसल्याने याबाबत ‘विदेशातून परतीच्या फ्लाईट प्लॅनमधून थायलंड बाद’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले होते. अखेर शासनाने ‘वंदे भारत मोहिमेत’ थायलंडचा समावेश करून तेथे अडकलेल्या महाराष्ट्रातील चार विद्यार्थ्यांना स्वगृही पोहोचविले. त्यामुळे या विद्यार्थ्यांनी लोकमतचे आभार मानले आहे.महाराष्ट्रासह राजस्थान, मध्यप्रदेश, तेलंगणा, केरळ व दिल्ली या राज्यातील १३ विद्यार्थी जानेवारी महिन्यात थायलंडला प्रशिक्षणाकरिता गेले होते. मात्र, कोविड-१९ च्या लॉकडाऊनमुळे या सर्व विद्यार्थ्यांनी भारतात परतण्यासाठी १६ एप्रिलला तिकीट काढले होते. त्यानंतर ते बँकॉकच्या विमानतळावर आल्यावर त्यांना भारतातही लॉकडाऊन असल्याने विमानसेवा बंद असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे या सर्व विद्यार्थ्यांची चांगलीच आबाळ झाली. विद्यार्थ्यांनी लगेच आपल्या नातेवाईकांसह लोकप्रतिनिधी व शासनाची संपर्क साधला. यातच त्यांना एक रात्र विमानतळावर काढावी लागली. त्यानंतर या विद्यार्थ्यांची वेगवेगळ्या ठिकाणी व्यवस्था करण्यात आली. यामध्ये महाराष्ट्रातील चार विद्यार्थ्यांचा समोवश असून त्या चारही विद्यार्थ्यांना बँकॉकमधील महाराष्ट्र मंडळामध्ये आधार देण्यात आला. तब्बल दोन महिने महाराष्ट्र मंडळात काढल्यानंतर ५ जून रोजी महाराष्ट्रातील चारही विद्यार्थी विशेष विमानाने मुंबईत दाखल झाले व तेथून आपापल्या गावी पोहोचले. यामध्ये वर्ध्यातील एका विद्यार्थ्याचा समावेश आहे.

दोन महिने घरच्यासारखा केला सांभाळबँकॉकमध्ये अडकून पडल्यानंतर एक रात्र विमानतळावर काढावी लागली. त्यानंतर बँकॉकमधील महाराष्ट्र मंडळाच्या अध्यक्ष अर्पिता कुलकर्णी यांच्यासह मंदार पारसनीस व सुदेशकुमार यांनी भारतीय दूतावासाकडून महाराष्ट्रातील ऋषिकेश भरत बच्छाव रा. सोयगाव ता. मालेगाव, संदीप भिकनसिंग निकुंभ रा. रायतेल ता. साक्री दीपक रमेश अहिरे रा. हाताने ता. मालेगाव व कुणाल संजय मानकर रा. वर्धा या चारही विद्यार्थ्यांची जबाबदारी स्वीकारली. दोन महिने विद्यार्थ्यांची जेवण व राहण्याची व्यवस्था केली तसेच शेवटच्या दिवसापर्यंत सर्व मदतही केली. महाराष्ट्र मंडळाने अडचणीत मदत करून घरच्यासारखी वागणूक दिली, असे मत या विद्यार्थ्यांनी व्यक्त केले.

लॉकडाऊनमुळे भारतात येण्याचा मार्ग बंद झाला होता. त्यामुळे एक रात्र बँकॉकच्या विमानतळावर काढावी लागली. त्यानंतर आम्ही इतरत्र संपर्क साधल्यानंतर तेथील महाराष्ट्र मंडळाने मोठा आधार दिला. तसेच लोकमतनेही आमची अडचण वृत्तांच्या माध्यमातून मांडून लक्ष वेधले. त्यामुळे आम्ही आता सुखरूप आमच्या घरी पोहोचलो. ज्यांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्षरीत्या सहकार्य केले त्या सर्वांचे आभार.- कुणाल मानकर, विद्यार्थी, वर्धा.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस