लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : इंस्टाग्रामवरील पोस्टवरून घडलेल्या वादात चार जणांवर चाकू हल्ला झाला. या हल्ल्यात एक जण जागीच ठार झाला तर अन्य तिघे गंभीर जखमी आहे. हा थरार शुक्रवारी सकाळी म्हाडा कॉलनी परिसरात घडली. समीर संजय मेटांगळे (१८) रा. संत तुकारात वॉर्ड असे मृताचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले. तर प्रणीत जानराव माथनकर (१८) रा. म्हाडा कॉलनी, जयराज दीपक येरणे रा. बोरगाव (मेघे), मोनू श्रीवास रा. गौरक्षण वॉर्ड अशी जखमींची नाव आहेत.घटनेची माहिती मिळताच रामनगर पोलिसांनी घटनास्थळ गाठले. तत्पूर्वी परिसरातील नागरिकांनी जखमींना जिल्हा सामान्य रुग्णायात रवाना केले. जखमींकडून आरोपींची नावे कळताच पोलिसांनी तत्काळ त्यांना ताब्यात घेतले. आरोपीचे नाव विभव गुप्ता असे आरोपीचे नाव असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणात आणखी आरोपी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली असून त्यांचा शोध सुरू असल्याचे पोलीस सुत्रांनी सागितले.पोलीस सुत्रानुसार, समीर मेटांगळे याचा इन्स्टाग्रामवरील संवादावरून त्याच्या काही मित्रांसोबत वाद झाला होता. हा वाद गत काही दिवसांपासून चांगलाच भडकला होता. याच वादाचा समझोता करण्याकरिता समीर मेंटांगळे व त्याचे मित्र प्रणीत माथनकर, जयराज येरणे, मोनू श्रीवास हे तिघे म्हाडा कॉलनी येथे गेले होते. परंतु येथे त्यांच्यात वाद झाला. या वादातून मारहाण सुरू झाली. यात आरोपीने जवळील चाकू काढून या चौघांवर सपासप वार केले. या हाणामारीत समीरच्या बरगड्यात चाकूचा जबर मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. तर इतर तिघे गंभीर जखमी झाले.नागरिकांनी चारही जखमींना जिल्हा सामान्य रुग्णालयात नेले असता वैद्यकीय अधिकाºयांनी तपासणीअंती समीर मेटांगळे याला मृत घोषित केले. तर उर्वरित तिघांवर उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच रामनगर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक तेलगोटे यांनी चमुसह घटनास्थळ गाठून पंचनामा केला.या घटनेप्रकरणी रामनगर पोलिसांनी प्रणीत माथनकर याच्या बयानावरून आरोपींवरूद्ध भादंविच्या कलम ३०२, ३०७ व मुंबई हत्यार कायद्याच्या कलम ४, २५ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे सांगण्यात येते. पुढील तपास सुरू आहे.मी येईस्तोवर शवविच्छेदन करू नकासमीर मेटांगळे याचा खून झाल्याची माहिती वडिलांना भ्रमणध्वनीवरून देण्यात आली. माहिती प्राप्त होताच स्वत:ला कसेबसे सावरत समीरच्या वडिलांनी प्रशिक्षणासाठी गावाबाहेर आहे. मी येईस्तोवर शवविच्छेदन करू नका असे पोलिसांना बोलल्याचे सुत्रांनी सांगितले.जयराजने केला विभवला फोनजयराज येरणे व त्याचे मित्र कॉलेजकडे जात असतत त्याने विभव गुप्ता याला जुन्या प्रकरणाचा निपटारा करण्यासाठी फोन केला. त्यावेळी येरणे याने त्याला मुनोत लॉन जवळ बोलविले. परंतु, गुप्ता याने आपण म्हाडा कॉलनी चौकात असल्याचे सांगताच जयराज, समीर, मोनु व सहकारी तेथे गेले. यावेळी झालेली शाब्दीक चकमक विकोपाला जाऊन चाकूने मारहाण करण्यात आल्याचे पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत पुढे आले आहे.रुग्णालयाला पोलीस छावणीचे स्वरूपम्हाडा कॉलनीतील चौक परिसरातील या घटनेतील मृतकासह जखमी जिल्हा सामान्य रुग्णालयात असल्याची माहिती मिळताच युवकांनी रुग्णालय परिसरात गर्दी केली होती. यावेळी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचा बंदोबस्तही होता. पोलिसी बंदोबस्तामुळे काही काळाकरिता जिल्हा सामान्य रुग्णालयाला पोलीस छावणीचे स्वरूप होते.
चौघांवर चाकू हल्ला; एक ठार, तीन गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2017 11:12 PM
इंस्टाग्रामवरील पोस्टवरून घडलेल्या वादात चार जणांवर चाकू हल्ला झाला. या हल्ल्यात एक जण जागीच ठार झाला तर अन्य तिघे गंभीर जखमी आहे. हा थरार शुक्रवारी सकाळी म्हाडा कॉलनी परिसरात घडली. समीर संजय मेटांगळे (१८) रा. संत तुकारात वॉर्ड असे मृताचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले.
ठळक मुद्देम्हाडा कॉलनीतील थरार : इंस्टाग्रामच्या पोस्टवरून हत्याकांड