शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

जीर्ण इमारतीतून चालते पशुसंवर्धनचे कामकाज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2017 12:31 AM

येथील पशुसंवर्धन विभागाचे कार्यालय अत्यंत जीर्ण इमारतीत असून कर्मचारी जीव मुठीत घेऊनच येथे काम करताना दिसतात.

ठळक मुद्देभिंतीला पडल्या भेगा : छताची झाली दैना

लोकमत न्यूज नेटवर्कसेलू/घोराड : येथील पशुसंवर्धन विभागाचे कार्यालय अत्यंत जीर्ण इमारतीत असून कर्मचारी जीव मुठीत घेऊनच येथे काम करताना दिसतात. तालुक्याच्या स्थळी असलेल्या या महत्त्वपूर्ण विभागाचा कारभार या इमारतीतून चालत असल्याने याविषयी नागरिक आश्चर्य व्यक्त करतात.या विभागाची इमारत सेलू पंचायत समितीच्या परीसरात आहे. कधीकाळी कर्मचाºयांचे असलेले क्वार्टर या विभागाला कार्यालय म्हणून देण्यात आले आहे. गत दोन वर्षाअगोदर या इमारतीच्या छताचा काही कोसळला होता. सुदैवाने कार्यालयात काम करणाºया कर्मचाºयांना कोणतीच दुखापत झाली नाही. या इमारतीच्या भिंतीना मोठमोठ्या भेगा गेल्या आहे. इमारतीच्या सभोवताल झाडाझुडपांचा वेढा आहे.या इमारतीत काही महत्त्वपूर्न यंत्र सुद्धा आहे. शेतकरी व पशुपालक विविध योजनांच्या लाभासाठी येथे येत असल्याने वर्दळ असते. ही इमारत कधी कोसळेल याची शाश्वती नसल्याने मोठी दुर्घटना होऊ शकते. असे असतांना या जीर्ण इमारतीतून अधिकारी व कर्मचारी आपला विभागाचा गाडा जीव मुठीत घेवून हाकलत आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या घटनेत साधन समुह केंद्राची इमारत धाराशाही झाली होती. १२ वर्षापूर्वी बांधण्यात आलेल्या इमारतीचे उदाहरण ताजे असताना अशा जीर्ण इमारतीत असणारे हे कार्यालय इतरत्र हलविण्याची गरज व्यक्त होत आहे.येथे आलेल्या कर्मचारी व नागरिकांच्या अंगावर कधी भिंत कोसळेल किंवा छत पडेल याचा नेम नसल्याने वेळीच खबरदारी घेणे गरजेचे ठरत आहे.लोकप्रतिनिधींचे दुर्लक्षजिल्ह्याच्या राजकारणात तालुक्यातील काही नेत्यांचा दबदबा असताना या इमारतीच्या बांधकामाला विकास निधी उपलब्ध करुन देण्याची मागणी आहे.विकासाच्या गप्पा करणाºया नेत्यांनी ६२ ग्रामपंचायतीचा कारभार पाहणाºया या कार्यालयाच्या स्थितीकडे दुर्लक्ष करणे धोकादायक असल्याच्या भावना व्यक्त होत आहे. एखादी दुर्घटना झाल्यास सदर कार्यालय इतरत्र हलविणार काय अशी चर्चा रंगत आहे.