लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शासकीय विभागांना हक्काचे कार्यालय मिळावे म्हणून प्रशासकीय भवनाची निर्मिती करण्यात आली; पण ही इमारतही अपुरी पडत आहे. परिणामी, अनेक शासकीय विभाग भाड्याच्या इमारतीत आहे. यातील जिल्हा उपनिबंधक कार्यालय तर जीर्ण इमारतीत सुरू आहे. जागा उपलब्ध नसल्याने पत्रव्यवहारही फोल ठरत आहे.शेतकरी, कृषी उत्पन्न बाजार समिती, सहकारी संस्था, पतसंस्था तसेच शासनाच्या अनेकविध कामांमध्ये जिल्हा उपनिबंधक कार्यालयाची महत्त्वाची भूमिका असते. सर्वांना सोईचे होईल, अशा ठिकाणी सदर कार्यालय असणे अगत्याचे असते. सहकारी संस्थांवर नियंत्रण ठेवणारे वर्धेतील हे कार्यालय सध्या वर्धा ते आर्वी रोडवर कार्यरत आहे. या कार्यालयाची इमारत सहकार नेत्याची असून ती सध्या जीर्ण झाली आहे. पावसाळा असल्याने इमारत कोसळण्याचा धोकाही निर्माण झाला आहे. काही दिवसांपूर्वी या इमारतीच्या दर्शनी भागातील स्लॅबचे काही भागातील प्लास्टर कोसळले. याचा अधिकारी, कर्मचाºयांनाही त्रास सहन करावा लागत आहे.गत अनेक वर्षांपासून उपनिबंधक कार्यालयाद्वारे इमारत बदलून मिळावी म्हणून पत्रव्यवहार केला जात आहे. प्रशासकीय भवनात जागा मिळावी वा अन्यत्र इमारत भाडेतत्वावर घेण्याची परवानगी मिळावी म्हणून पत्रव्यवहार करण्यात आला; पण त्याचा फारसा उपयोग झाला नाही. काही दिवसांपर्वी जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी जिल्हा उपनिबंधक कार्यालयाला भेट देत पाहणी केली. त्यांनीही या कार्यालयाची इमारत बदलणे वा शासकीय इमारत मिळणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले; पण शासकीय इमारतच उपलब्ध नसल्याने स्थानांतरण प्रलंबित राहिले असून याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.कार्यालयाची इमारत जीर्ण झाली असून स्लॅबचे प्लास्टर कोसळले आहे. जागा बदलून मिळावी म्हणून अनेक वर्षांपासून पत्रव्यवहार सुरू आहे. काही दिवसांपूर्वी जिल्हाधिकाºयांनीही भेट देत पाहणी केली. त्यांनीही इमारत बदलणे गरजेचे असल्याचे नमूद केले; पण शासकीय जागाच नसल्याने येथूनच कामकाज सांभाळावे लागत आहे.- अजय कडू, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, वर्धा.
जीर्ण इमारतीतून उपनिबंधकांचे कामकाज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2017 1:30 AM
शासकीय विभागांना हक्काचे कार्यालय मिळावे म्हणून प्रशासकीय भवनाची निर्मिती करण्यात आली; पण ही इमारतही अपुरी पडत आहे.
ठळक मुद्देदुरूस्तीचीही बोंबच : जागेअभावी पत्रव्यवहारही निरूपयोगी